वॉशिंग्टन : अमेरिकेत माजी विद्यार्थ्यांचा अंधाधुंद गोळीबार केला आहे.
फ्लोरिडामध्ये एका शाळेत बुधवारी माजी विद्यार्थ्याने गोळीबार केला आहे. या गोळीबारात 17 लोकांचा मृत्यू झाला असून 20 लोकांहून अधिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केले आहे. आरोपी विद्यार्थी शाळेतून काढून टाकल्यामुळे भरपूर नाराज झाला होता. यामुळे त्याने हा प्रकार केला आहे.
My prayers and condolences to the families of the victims of the terrible Florida shooting. No child, teacher or anyone else should ever feel unsafe in an American school.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 14, 2018
डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेबाबत ट्विटकवरून शोक व्यक्त केला आहे. मी गर्व्हनर रिक स्कॉटशी याबाबत चर्चा केली आहे. कायद्याची मदत घेऊन आम्ही या घटनेचा तपास करू असे त्यांनी सांगितले आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या प्रकरणानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत असुरक्षित वाटता कामा नये असे देखील त्यांनी सांगितले.
Florida school shooter identified as 19 year old Nicolas Cruz: US media
— ANI (@ANI) February 15, 2018
#UPDATE 17 dead in Florida school shooting: AFP #USA
— ANI (@ANI) February 15, 2018
हा प्रकार करणाऱ्या विद्यार्थी आरोपीची ओळख पटली असून 19 वर्षीय निकोल्स क्रूज असे त्याचे नाव आहे.