WhatsApp चं नवं फिचर, क्षणार्धात नाहीसे होतील Photo, Video; कसं ते पाहा

जाणून घ्या कसं काम करतं हे फिचर   

Updated: Aug 4, 2021, 07:33 PM IST
WhatsApp चं नवं फिचर, क्षणार्धात नाहीसे होतील Photo, Video; कसं ते पाहा  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

Whatsapp View Once Feature: Whatsapp चे येणारे प्रत्येक अपडेट हे युजर्ससाठी नवी पर्वणी असतात. अॅपचा वापर अधिकाधिक सोपा आणि तितकाच नावीन्यपूर्ण करण्याच्या दृष्टीने या अॅपमध्ये नवनवीन फिचर्स जोडले जातात. सध्याही Whatsappनं असंच एक फिचर सर्वांच्या भेटीला आणलं आहे. ज्याचा युजर्सना बराच फायदा होणार आहे. 

Whatsapp नं आणलेलं हे फिचर आहे, View Once Photos and Videos. हे फिचर फोटो आणि व्हिडीओसाठी सादर करण्यात आलं आहे. ज्याची तुलना Disappearing फिचरशी केलं जाऊ शकतं. 

WhatsApp नं लाँच केलेल्या या फिचरचा वापर अतिशय सोपा आहे. ज्यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळी ट्रीक वापरात आणण्याची गरज नाही. View Once या फिचरअंतर्गत तुम्ही जर एखादा फोटो किंवा व्हिडीओ एकदा पाहत आहात, तर त्यानंतर तो लगेचच डिलीट होईल. अशाच पद्धतीचं एक फिचर काही काळापूर्वी इन्स्टाग्रामने लाँच केलं होतं. ज्याचा वापर युजर्सनी मोठ्या प्रमाणात केला होता. 

राज्यात पोलीस मेगाभरती सुरु; जाणून घ्या उपलब्ध जागांची संख्या 

 

कसं काम करतं हे फिचर 
सर्व फोटो आणि व्हिडीओसाठी हे फिचर वापरात आणलं जाऊ शकत नाही. तुम्ही ज्या व्हिडीओ आणि फोटोंना या फिचरच्या माध्यमातून पाठवाल, तेच पाहिल्यानंतर डिलीट होईल. 

हे फिचर वापरण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ सिलेक्ट केल्यानंतर कॅप्शन बारमध्ये ‘1’ Icon दिसेल. फोटो आणि व्हिडीओ View once च्या माध्यमातून पाठवायचे असल्यास त्या पर्यायावर क्लिक करा. 

गॅलरीमध्ये सेव्ह होणार नाही कंटेंट 
View once या फिचरच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला व्हिडीओ आणि फोटो चॅटमधून दिसेनासा होण्यासोबतच गॅलरीतूनही डिलीट होईल. किंबहुना तो सेव्हच होणार नाही. शिवाय हा कंटेंट फॉरवर्डही करता येणार नाही. इतकंच नव्हे, तर हे व्हिडीओ आणि फोटो 14 दिवसांच्या आधी पाहिले नाहीत, तर ते चॅटमधून आपोआप दिसेनासे होतील.