Salman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा

#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा वाढदिवस आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, सुमारे 40 कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. या हॅकर्सनी भाईजानचा ही डेटा चोरला आहे. 

Updated: Dec 27, 2022, 08:57 AM IST
Salman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा   title=
salman khan personal data sale

Dark Web:  एलॉन मस्क ट्विटर कंपनीचे मालक झाल्यापासून चर्चेत आहे. त्यातच आता एक नवीन अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, एका हॅकरने सुमारे 400 दशलक्ष वापरकर्त्यांचा डेटा चोरला आहे. यामध्ये Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान (#HappyBirthdaySalmanKhan) यांच्या नावाचा ही समावेश आहे. या सर्वांचा वैयक्तिक डेटा डार्क (Dark Web) वेबवर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

 40 कोटी यूजर्सचा डेटा चोरीला

इस्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनी हडसन रॉकने आपल्या अहवालात खुलासा केला आहे की, मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या सुमारे 40 कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. हा डेटा हॅकरने चोरला असून डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. चोरीला गेलेल्या डेटामध्ये वापरकर्त्यांची नावे, ईमेल आयडी, फॉलोअर्सची संख्या आणि वापरकर्त्यांचे फोन नंबर याचा समावेश आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी 5.4 दशलक्ष युजर्सचा डेटा लीक झाला होता. (Twitter Data Leak) 

अनेक हॅकर्सनी डेटाचा नमुना ऑनलाइन शेअर केला आहे. ज्यामध्ये अनेक मोठी नावे दिसत आहेत. यावेळी त्याने अनेक हाय-प्रोफाइल खातीही हॅक केल्याचे लीकवरून दिसून येते.

वाचा : भाईचा बर्थडे; सलमानसाठी शाहरुखसह एकवटल्या त्याच्या खास मैत्रिणी, पाहा आणखी कोणी लावली हजेरी 

या लोकांचा वैयक्तिक डेटा चोरीला

- Alexandria Ocasio-Cortez

- SpaceX

- CBS Media

- Donald Trump Jr.

- Doja Cat

- Charlie Puth

- Sundar Pichai

- Salman Khan

- NASA's JWST account

- NBA

- Ministry of Information and Broadcasting, India

- Shawn Mendes

- Social Media of WHO 

हडसन रॉक यांनी सांगितले की, एपीआय असुरक्षिततेमुळे हॅकर करोडो वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश करू शकला आहे. हे बगमुळे देखील होऊ शकते. हडसन रॉकने हॅकरच्या पोस्टचा स्क्रीनशॉट डार्क वेबवर शेअर केला आहे. ज्यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.  ज्यामध्ये सलमान खानचेही नाव आहे. 

5.4 मिलियन यूजर्सचा डेटा लीक

याआधीही ट्विटरच्या सुमारे 5.4 मिलियन म्हणजे 54 लाख यूजर्सचा वैयक्तिक डेटा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. तर दुसरीकडे या वर्षी 2022 मध्ये यूजर्सचा डेटा हॅक झाला होता. हा डेटा लीक त्याच बगमुळे झाला होता. ज्यासाठी ट्विटरने बग बाउंट प्रोग्राम अंतर्गत zhirinovskiy नावाच्या हॅकरला 5,040 डॉलर म्हणजेच 4,02,386 रुपये दिले होते. हॅकरने हा डेटा हॅकर्स फोरमवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला होता. या डेटा लीकमध्ये युजर्सच्या पासवर्डचा समावेश नव्हता.