नवी दिल्ली : लिनोवोने नुकताच भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लिनोवो K8 Note लॉन्च केलाय. हा स्मार्टफोन K6 सीरीजचा व्हेरिएंट आहे. ज्यात डिझाईन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि फिचर्स अधिक चांगले देण्यात आले आहेत.
कंपनीने या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट सादर केले आहेत. पहिल्या व्हेरिएंटमध्ये ३ जीबी रॅम दिली आहे. याची किंमत १२ हजार ९९९ रूपये इतकी आहे. तर दुस-या व्हेरिएंटमध्ये ४ जीबी रॅम असून त्याची किंमत १३ हजार ९९९ रूपये इतकी आहे. हा स्मार्टफोन आजपासून(शुक्रवार) अॅमेझॉन इंडियावर दुपारी १२ वाजेपासून सेलसाठी उपलब्ध असणार आहे.
अॅमेझॉन इंडियाने लिनोवो K8 Note स्मार्टफोनवर काही ऑफर्सही दिल्या आहेत. लिनोवो K8 Note खरेदी करताना अॅमेझॉन किंडल बुकसाठी ३०० रूपयांची क्रेडीट ऑफर दिली जाणार आहे. सोबतच ६९९ रूपयांमध्ये यूजर्स मोटोरोला हेडफोनही घेऊ शकता. या हेडफोनची किंमत १ हजार ५९९ रूपये इतकी आहे. तर ३४३ रूपयांच्या रिचार्जवर आयडिया यूजर्सना ६४ जीबी ४ जी डेटा आणि अनलिमीटेड कॉल सुद्धा दिले जाती. याची वैधता ५६ दिवसांची असेल.
लिनोवो K8 Note स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिलं गेलंय. यात दोन कॅमेरा फिचर्स आहेत. ज्यात फोटो काढण्यासाठी १३ मेगापिक्सलचं सेंसर आणि डेप्थ इन्फॉर्मेशन कॅप्चरसाठी ५ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा सेंसर देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये DSLR सारखा bokeh effect इफेक्ट देण्यात आलाय.
लिनोवो K8 Note स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले दिलाय. सोबतच या स्मार्टफोनमध्ये २.५ डी कर्व्ड दिलं गेलंय. तसेच, या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ देण्यात आला आहे. लिनोवो K8 Note हा फोन MediaTek Helio X23 डेका-कोर प्रोसेसरवर आधारित आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या व्हेरिएंटमध्ये ३ जीबी रॅमसोबत ३२ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आलं आहे. तर दुस-या व्हेरिएंटमध्ये ४ जीबी रॅमसोबत ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिलं गेलंय.
फोटोग्राफीसाठी K8 Note मध्ये एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा दिला आहे. तर व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. पावर बॅकअपसाठी लिनोवो K8 Note स्मार्टफोनमध्ये ४,००० एमएएच ची बॅटरी दिली गेलीये.
तसेच या स्मार्टफोन्मध्ये फिंगरप्रिंत सेंसर देण्यात आलंय. कनेक्टीव्हिटी ऑप्शनसाठी ४ जी वोएलटीई सपोर्ट, वायफाय, ब्ल्यूटूथ आणि जीपीएस सुद्धा आहे.