nilesh rane

भास्कर जाधवाविरोधात अपक्ष निवडणूक लढवू- नीलेश राणे

कोकणात निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पुन्हा पेटलाय. भास्कर जाधव यांच्याविरोधात गुहागरमधून अपक्ष निवडणूक लढण्याचा एल्गार निलेश राणे यांनी केलाय. जाधवांची पैशाची मस्ती उतरवू असा निर्धार निलेश राणे यांनी केलीय.

Aug 16, 2014, 07:20 PM IST

उद्योगमंत्री राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ

उद्योगमंत्री नारायण राणे हे सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ आहेत. कर्तृत्व असूनही पक्षामध्ये संधी मिळत नाही, महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सरकारमध्ये डावललं जातं, अशी माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंची भावना झालीय...

Jun 2, 2014, 06:44 PM IST

नारायण राणे देणार राजीनामा, रत्नागिरीत प्रतिक्रिया

काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे मुलगा नीलेश राणे यांचा पराभव दिसू लागल्याने राणे नाराज झालेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. तशी माहिती त्यांनी रत्नागिरीत दिली.

May 16, 2014, 12:53 PM IST

सिंधुदुर्गात तणावपूर्ण शांतता, राणे-केसरकरांनी काढले उणे-दुणे

कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात मतदान 17 तारखेला होणार आहे. या मतदारसंघात निलेश राणे विरूद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशीच दिसून येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचे हत्यार उपसत राणेंनाच शह दिल्याने रंगत वाढली आहे.

Apr 16, 2014, 09:17 AM IST

सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीत राडा, आघाडीच्या बैठकीत कानाखाली

कोकणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये प्रचंड रा़डा सुरू आहे. सिंधुदुर्गमधील वाद क्षमण्याची चिन्हे नसतानाच रत्नागिरीच्या काँग्रेस भवनात जोरदार राडा झाला. आघाडीच्या बैठकीत हा राडा झाल्याने काँग्रेसला लोकसभा निवडणूक जड जाण्याचे संकेत मिळत आहेत.

Apr 12, 2014, 04:45 PM IST

कोकणात राष्ट्रवादीचा असहकार, राणेंचे डोकेदुखी वाढली

सध्या कोकणात राणे विरुद्ध राष्ट्रवादी असं धुमशान सुरू आहे. राष्ट्रवादीच्या या असहकारामुळे काँग्रेसची अर्थात राणे यांची डोकेदुखी वाढली आहे. नक्की कोकणातला हा राडा काय आहे. आणि त्याचा या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याचीच चर्चा जास्त आहे.

Apr 12, 2014, 04:31 PM IST

राणेंविरोधात भूमिका घेणाऱ्या सावंत यांना पक्षाची नोटीस

उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेस आमदार विजय सावंत यांना पक्षाने नोटीस बजावली आहे. राणेंविरोधातील भूमिकेबाबत तात्काळ खंडन करा आणि कामाला लागा अन्यथा कारवाई केली जाईल, असे दिलेल्या नोटीसमध्ये इशारा देण्यात आला आहे.

Apr 11, 2014, 06:23 PM IST

अजित पवार भडकलेत, राणेंबाबत भूमिकेवर दमबाजी

रत्नागिरी-सिंधुदुर्गातल्या वादावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या आदेशांचं पालन करावं असा दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. सिंधुदुर्गात झालेल्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना दम दिलाय.

Apr 11, 2014, 05:36 PM IST

राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचाच राणेंवर हल्लाबोल

काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनीही `घरचा आहेर` दिल्यानं उद्योगमंत्री नारायण राणेंची डोकेदुखी आणखी वाढलीय. राणेंनी सिंधुदुर्गातली काँग्रेस संपवली. आता जी अस्तित्वात आहे ती राणे समर्थक काँग्रेस आहे, असा तिखट हल्ला सावंत यांनी चढवलाय.

Apr 9, 2014, 06:57 PM IST

`राजीनामे देऊ पण राणेंचा प्रचार करणार नाही`

सिंधुदुर्गात काँग्रेस-राष्ट्रवादी वाद चिघळल्याचं दिसतंय. राणेंच्या प्रचारासाठी वरिष्ठांकडून येत असलेला दबाव धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले राजीनामेच सादर केलेत.

Apr 9, 2014, 01:45 PM IST

सेनेच्या बटनाला शॉक लागेल, राणेंचा अजब प्रचार

दोनदा मतदान करा, असा अजब सल्ला देणा-या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याबद्दलचा वाद शमत नाही तो नारायण राणेंनीही नवीन वादाला तोंड फोडलंय. महायुतीच्या धनुष्यबाणावर मत देण्यास मतदान यंत्राचं बटण दाबाल तर शॉक लागेल, असं राणे म्हणालेत.

Apr 7, 2014, 03:55 PM IST

राणेंचा प्रचार नाही, दीपक केसरकर आक्रमक

कोकणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. काँग्रेसनेते नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी मदत न करण्याचा निर्णय सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगूनही दीपक केसरकर आक्रमक दिसत आहे. ते आपल्या निर्णयावर ठाम असून नीलेश राणेंचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केलेय. दरम्यान, आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार, अशी माहिती केसरकर यांनी दिलेय.

Apr 3, 2014, 11:27 AM IST

राऊत, राणे आज भरणार अर्ज, राणेंचा राष्ट्रवादीला इशारा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार असून यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

Mar 25, 2014, 09:25 AM IST