nda

NDAची केंद्रात स्वबळावर सत्ता येईल - भाजप

16 तारखेच्या निकालानंतर NDAची केंद्रात स्वबळावर सत्ता येईल, असा विश्वास भाजप नेत्यांना आहे. मात्र पक्षातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NDAला एनडीएला 290 ते 305 जागा मिळतील. मात्र एखादा पक्ष न मागता एनडीएला पाठिंबा देऊ इच्छित असेल तर आम्ही त्याचं स्वागत करु असंही भाजपनं स्पष्ट केलंय.

May 14, 2014, 08:11 AM IST

नरेंद्र मोदींना मुस्लिम आणि दलितांचे समर्थन

इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला २६१ ते २८३ जागा मिळू शकतात. सर्वेनुसार नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान होणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अबकी बारचे उत्तर मोदी सरकार हेच असेल असा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

May 13, 2014, 03:53 PM IST

मोदींची काँग्रेसवर टीका, एनडीएच सत्तेत येणार - एजन्सी

आगामी लोकसभेत काँग्रेसचे खासदार शोधण्यासाठी कॅमेरे लावावे लागतील, असा टोला एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लगावलाय. झारखंडमधल्या हाजारीबागमधल्या सभेत ते बोलत होते. दरम्यान, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज एका प्रख्यात एजन्सीनं केलेल्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.

Apr 15, 2014, 02:52 PM IST

रणसंग्राम २०१४ - पक्षांची सद्यस्थिती

लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे, सोळाव्या लोकसभेत विजय मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशा परिस्थितीत कोणता पक्ष कोणत्या स्थितीत आहे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

Apr 4, 2014, 10:07 PM IST

के. चंद्रशेखर राव : टीआरएस ठरणार किंगमेकर

के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. स्वतंत्र तेलंगणा हे त्यांच्यासह लाखो कार्यकर्त्यांच स्वप्न होतं.

Apr 4, 2014, 04:44 PM IST

शरद पवार यांना एनडीएमध्ये घुसू देणार नाही- उद्धव

शरद पवार यांना एनडीएमध्ये घुसू देणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. पवारांना एनडीएत येण्याची इच्छा होती मात्र आपल्यासह गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी रामदास आठवले यांनी कडाडून विरोध केला, त्यामुळं त्यांचं स्वप्न निवडणुकीच्या आधीच भंगलं, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

Mar 31, 2014, 11:11 AM IST

`एनडीए`मध्ये राम परतणार?

एलजेपीचे अध्यक्ष रामविलास पासवान `एनडीए`त प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय. काँग्रेससोबत अनेकदा चर्चा झाली. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं भाजपचा पर्याय खुला असल्याचं रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलंय.

Feb 26, 2014, 06:25 PM IST

एनडीए, काँग्रेस विरोधात ११ पक्ष एकत्र

भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसच्या यूपीएला पराभूत करण्यासाठी परस्पर सहकार्यानं आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय 11 पक्षांनी घेतलाय.

Feb 25, 2014, 11:00 PM IST

पवारांपाठोपाठ मुंडेंचा गौप्यस्फोट; आघाडीला धक्का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना केली.

Feb 9, 2014, 11:21 PM IST

१० रुपये भरून व्हा मोदींच्या रॅलीत सहभागी!

एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची दक्षिण भारतात आज पहिल्यांदा रॅली निघणार आहे. या रॅलीत तुम्हालाही सहभागी होण्याची इच्छा असेल तर मात्र तुम्हाला १० रुपये भरावे लागणार आहेत.

Sep 26, 2013, 12:45 PM IST

मोदींच्या सभेसाठी १० हजार बुरख्यांची खरेदी - दिग्गीराजा

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

Sep 24, 2013, 07:47 PM IST

भाजपचा सत्तेचा मंत्र, जोडणार आता नवे मित्र

2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला आपली सत्ता यायला हवी असेल, तर त्यांना आहे ते सहकारी पक्ष टिकवण्यासोबतच नवे मित्र जोडावेही लागणार आहेत.

Sep 23, 2013, 09:23 PM IST

पंतप्रधानपदाचा उमेदवार NDA बैठकीतच- उद्धव

उद्धव ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.

Jul 20, 2013, 04:00 PM IST

भाजपनं विश्वासघात केला - नितीशकुमार

भाजपला वाजपेयी आणि अडवाणींचा विसर पडल्याचा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लगावलाय. तसंच भाजपनं विश्वासघात केल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केलाय.

Jun 17, 2013, 03:30 PM IST

जेडीयूचा भाजपपासून काडीमोड!

जेडीयुनं एनडीए आणि भाजपपासून काडीमोड घेतलाय. भाजपमधील घडामोडी जेडीयुच्या धोरणांशी विसंगत असल्याचं सांगत नैतिकतेच्या आधारावर एनडीएपासून फारकत घेत असल्याची घोषणा जेडीयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी केलीय.

Jun 16, 2013, 05:55 PM IST