garbage

कल्याण डोंबिवलीच्या डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न बिकट, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग

कल्याण डोंबिवलीच्या डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झाला असून कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने गाड्यांची रांग थेट दुर्गाडी चौकापर्यंत पोहोचली आहे. त्यामूळे कचरा टाकण्यासाठी आलेल्या एका एका गाडीला ४ ते ६ तास थांबावे लागत आहे.

Aug 22, 2017, 11:43 PM IST

राणीच्या बागेत कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प

राणीच्या बागेत कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प

Jun 14, 2017, 02:41 PM IST

पुण्यातील कचरा प्रश्न पुन्हा पेटणार

कचरा डेपोग्रस्त ग्रामस्थ पुन्हा एकदा आंदोलनांच्या पवित्र्यात आहेत. मागील आंदोलनाच्या वेळी दिलेलं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळलं नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पुन्हा आजपासून कचरा बंदचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कचरा डेपो परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर आज महापालिककडून डेपोमध्ये कचऱ्याच्या गाड्या पाठवण्यातच आलेल्या नाहीत.

Jun 9, 2017, 02:00 PM IST

कोल्हापुरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर

कोल्हापुरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर

May 9, 2017, 06:17 PM IST

पुण्यातील कचरा प्रश्नाची कोंडी कायम, राज्यमंत्री शिवतारेंचा प्रयत्न अयशस्वी

पालकमंत्री तसेच महापौरांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री विजय शिवतारेंनी आज पुण्यातील कचरा कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला. ठरलेल्या मुदतीत कचरा डेपोचा प्रश्न सुटला नाही तर थेट राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र त्याउपरही आंदोलनकर्ते ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. स्वतःच्या तोंडावर पट्टया बांधून त्यांनी माघारीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

May 6, 2017, 06:51 PM IST

पुणेकरांनो २२ दिवसांची कचरा कोंडी यामुळे...

पुण्यातील कचरा प्रश्न २२ दिवसांनंतरही सुटलेला नाही. महापालिका आणि राज्यातील सत्त्ताधारी भाजपचं या प्रश्नाकडील दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. तसंच, या प्रश्नामागे राजकीय आणि प्रशासकीय बाजू देखील आहे. पाहुयात एक रिपोर्ट

May 5, 2017, 07:00 PM IST

पुण्यातील कचरा कोंडी फोडण्याचा भाजपचा प्रयत्न

आंदोलकांमध्ये फूट पाडून कचरा कोंडी फोडण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे. फुरसुंगीतल्या भाजप समर्थकांशी चर्चा सुरू झाली आहे. कचरा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

May 5, 2017, 06:00 PM IST