development

विकासासाठी बांधील, महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

आज महाराष्ट्र दिन. भाषिक निकषानुसार स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा आज ५५ वा वर्धापन दिन. या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी प्राण वेचणाऱ्या हुतात्म्यांच्या मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर सकाळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र वाहिलं. राज्याच्या विकासासाठी आपण बांधील असल्याची ग्वाही देत, त्यासाठी झटण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. 

May 1, 2015, 08:57 AM IST

पंढरपूरसाठी ६४७ कोटींचा विकास आराखडा

पंढरपूरसाठी ६४७ कोटींचा विकास आराखडा

Mar 27, 2015, 09:52 PM IST

ग्रामीण विकासाबरोबर रस्ते, रेल्वे, जेटी विकासाला प्राधान्य - अर्थमंत्री

जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, अशी घोषणा करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरा यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात केली. रस्ते, रेल्वे मार्ग विकासाबरोबर ग्रामीण विकासावर भर दिला. तसेच सागरी रस्ते विकासाबरोबरच जेटी सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, खासदारांप्रमाणे आमदारांनी आदर्श गावासाठी गाव दत्तक घेण्यावर भर देण्यात आलाय.

Mar 18, 2015, 03:55 PM IST

वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे - पंतप्रधान मोदी

देशात वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. त्याचवेळी वाराणसीमधील विणकरांनी ई-कॉमर्सच्या वाढत्या बाजारपेठेच्या माध्यमामधून ग्राहकांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले. 

Nov 7, 2014, 01:54 PM IST

महाराष्ट्राला लुटलं गेलंय, विकासासाठी बहुमत द्या - नरेंद्र मोदी

महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ आहे. गेल्या ६० वर्षात महाराष्ट्राला काँग्रेसने कुठे नेवून ठेवलाय. महाराष्ट्राला लुटलं गेलं आहे. विकास केला नाही. कुठे नेला आहे, याला कोण जबाबदार आहे, असा सवाल करत महाराष्ट्रात भाजपला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. ते जाहीर प्रचार सभेत बोलत होते.

Oct 4, 2014, 06:33 PM IST

सबका साथ, सबका विकास - अर्थमंत्री जेटली

 देशात महागाईचे आव्हान असून त्यावर विचार करण्यात येत असून ही महागाई कशी कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.

Jul 10, 2014, 11:17 AM IST

पंतप्रधानपदाची प्रतिभा ओळखून टीका करा - प्रियांका

प्रियांका गांधी यांचं वक्तव्य लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत असल्याचं चित्र आहे. कारण अमेठीत प्रियांका गांधी यांनी आपले भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे.

Apr 29, 2014, 07:43 PM IST

धुळे, नंदुरबारचा विकास का नाही, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

नंदुरबारमध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. गुजरातचा विकास होतो मात्र जवळच्या धुळे, नंदुरबारचा का नाही, असा सवाल नरेंद्र मोदींनी केलाय.

Apr 22, 2014, 01:38 PM IST

गुजरातचा विकास खरा की खोटा?

नरेंद्र मोदी यांनी काम कमी आणि मार्केटिंग जास्त केलं, नरेंद्र मोदी यांनी मार्केटिंगवर दहा हजार कोटी रूपये खर्च केले, असा आरोप तुमच्यावर होतोय, या विषयी काय सांगाल?, असा प्रश्न मोदींनी एएनआयने विचारला.

Apr 16, 2014, 09:39 PM IST