सोनिया गांधी

सोनिया गांधींच्या निवासस्थानी काँग्रेस कमिटीची बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळातल्या संभाव्य फेरबदलांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळात 10 मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच राहुल गांधींना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे.

Sep 25, 2012, 10:14 AM IST

बाबा दिल्लीत; नवीन चेह-यांना संधी?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची १० जनपथवर भेट घेतली. त्यांच्यासह सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हेदेखील त्यांच्यासोबत होते.

Sep 24, 2012, 04:30 PM IST

सोनिया गांधींचा कँसरवर विजय

सोनिया गांधी यांचा कँसरशी सुरू असलेल्या लढ्यात सोनिया गांधी विजयी झाल्या आहेत. त्यांना झालेला कँसर संपूर्णतः बरा झाला आहे. कँसरवरील उपचारांसाठी सोनिया गांधी अमेरिकेमध्ये गेल्या होत्या. आता १२ सप्टेंबर रोजी सोनिया पुन्हा भारतात येतील.

Sep 10, 2012, 05:24 PM IST

संसद गोंधळात!

कोळसाखाण घोटाळ्यावरुन झालेल्या गदारोळामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज ३० तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलंय.

Aug 28, 2012, 10:24 PM IST

सोनिया गांधींनी टाकलं मिशेल ओबामांनाही मागे!

`फोर्ब्स मॅग्झीन`ने जगातील शक्तीशाली शंभर महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या पत्नी मिशेल ओबामांना मागे टाकलंय.

Aug 23, 2012, 01:17 PM IST

युपीएचं सरकार अनौरसच!- बाळासाहेब

युपीए-२ सरकार अनौरसआहे, हे विधान केल्याबद्दल लालकृष्ण अडवाणींवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अडवणींच्या विधानावर आपल्या ठाकरी शैलीत पाठिंबाच दिला आहे. अडवाणींच्या तोंडून चुकीने का होईना सत्य बाहेर पडलं, असं बाळासाहेबांनी ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.

Aug 11, 2012, 05:38 PM IST

संजय दत्तांचा लाळघोटेपणा, जय सोनियाचा नारा

नेहरू-गांधी घराण्यासमोर लाळ घोटणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची कमी नाही आहे. सोनिया गांधी यांना खूप करण्यासाठी काँग्रेसचे काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी आज कहरच केला. विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेताना संजय दत्त यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रबरोबर जय सोनियाचा नारा दिला.

Jul 31, 2012, 09:09 PM IST

पवारांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री दिल्ली दरबारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्लीदरबारी दाखल झाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली. दहा जनपथवर सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांच्यावर शरद पवारांनी टीका केली होती.

Jul 30, 2012, 04:44 PM IST

सोनिया-राहुल यांना आव्हान म्हणजे हत्तीशी टक्कर!

आज अण्णा हजारे जंतर मंतरवर उपोषणाला बसल्यापासून गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गेले चार दिवस टीम अण्णांच्या उपोषणाच्या आंदोलनाची हेटाळणी करणाऱ्य़ा काँग्रेसलाही आता त्याची दखल घेणं भाग पडलं आहे.

Jul 29, 2012, 06:52 PM IST

पवारांची नाराजी महाराष्ट्राच्या पथ्यावर?

शरद पवारांची नाराजी दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातले दुष्काळग्रस्त आणि सिंचन प्रकल्पाच्या मदतीसाठी केंद्र सरकार साडे तीन हजार कोटींची मदत करणार असल्याचं समजतंय.

Jul 25, 2012, 12:39 PM IST

शरद पवारांचा काँग्रेसवर रूसवा कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार पु्न्हा नाराज झाले आहेत. हे त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत आहे. याआधी नंबर दोनवरून धुसफुस झालेल्या पवारांनी राजीनाम्याची तयारी चालविली होती. त्याबाबत मीडियात खूप चर्चा झाली. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेटही घेतली होती. त्यामुळे पवार काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले होते. आता तर त्यांनी चहापानाला अनुपस्थिती दर्शवली.

Jul 23, 2012, 12:33 PM IST

मोठ्या 'जबाबदारी'साठी युवराज सज्ज!

राहुल गांधींनी मोठी जबाबदारी स्विकारावी, अशी काँग्रेस नेत्यांकडूनच होणाऱ्या मागणीबद्दल आज पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी मौनव्रत तोडलंय. आपण लवकरच पक्षात आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी स्विकारणार असल्याचं सुतोवाच आज खुद्द ‘युवराजां’नी केलंय.

Jul 19, 2012, 12:36 PM IST

अशोक चव्हाण समर्थकांची धाव प्रभारीपर्यंत

माजी मुख्यमंत्री आणि आदर्श घोट्याळ्यात आरोप ठेवण्यात आलेले अशोक चव्हाण यांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या अशोक चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारलीय. त्यामुळं आता चव्हाण समर्थक आमदार महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.

Jul 11, 2012, 06:38 PM IST

पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडची साथ

अशोक चव्हाणांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारली आहे. अशोक चव्हाणांना एकटे पाडल्याचा आरोप करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अशोक चव्हाण समर्थक आमदार सोनियांकडे तक्रार करणार होते.

Jul 11, 2012, 01:22 PM IST

विधान परिषदेसाठी कोण असतील काँग्रेस उमेदवार?

आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली.

Jul 8, 2012, 12:37 PM IST