सिगारेट

देशात आजपासून सिगारेट उत्पादकांचे 'नो स्मोकिंग'

मुंबई : प्रमुख सिगारेट उत्पादक कंपन्या असणाऱ्या आयटीसी, गॉडफ्रे फिलीप्स आणि व्हीएसटी यांनी देशात सिगारेट तयार करण्याचे कारखाने १ एप्रिल २०१६ पासून एकमताने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने नव्याने दिलेल्या आदेशाप्रमाणे सिगारेटच्या पाकिटावरील ८५% भागावर तंबाखू सेवनाचे धोके स्पष्टपणे नमूद करण्याचे सांगण्यात आले आहे. याला विरोध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. 

Apr 2, 2016, 08:44 AM IST

'पार्टटाईम' भोंदूबाजी करणाऱ्या सिगरेटवाल्या बाबाला अटक

'सिगरेटवाला बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भोंदूबाबाला नागपूरमध्ये अटक करण्यात आलीय. 

Mar 1, 2016, 04:28 PM IST

११२ वर्षांच्या महिलेच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट दिवसाला ३० सिगारेट

 ११२ वर्षीय महिलेने अजब दावा केला आहे. दिवसाला ३० सिगारेट ओढल्याने तिचे ती दीर्घायुषी झाली आहे. गेल्या ९५ वर्षांपासून ती सिगारेट ओढत असल्याचेही तिने सांगितले आहे. 

Jan 27, 2016, 09:31 PM IST

सावधान : अल्पवयीन मुलांना सिगारेट, टोबॅको विकली तर...

आता, १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सिगारेट किंवा टोबॅकोचा समावेश असलेले पदार्थ विकणं हा देखील फौजदारी गुन्हा (क्रिमिनल ऑफेन्स) आहे. या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. शिवाय एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. 

Jan 15, 2016, 05:02 PM IST

सिगारेट सोडा, श्रीमंत व्हा...

तुम्ही सिगारेट ओढतात का? किंवा तुमच्या नात्यातील किंवा जवळचा व्यक्ती सिगारेट ओढतो का? तर त्याला सांगा कृपया सिगारेट ओढू नको. 

Jan 8, 2016, 04:22 PM IST

शरीरासाठी हानिकारक असतात सुगंधित मेणबत्त्या

 बर्थडे पार्टी, ख्रिसमस पार्टी अथवा फॅमिली पार्टीमध्ये हल्ली सुगंधित मेणबत्त्यांचा वापर सर्रासपणे केला जातो. या मेणबत्त्या रोषणाईसोबतच घरही सुगंधित करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का या मेणबत्त्या तुमच्या स्वास्थासाठी किती धोकादायक आहेत.

Dec 17, 2015, 11:18 AM IST

सिगारेटपेक्षा ही जास्त घातक 'डासांची अगरबत्ती'

फुफ्फुसांना होणारा आजार सीओपीडी हा मुख्यतः धुरामुळे होतो. या आजारामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही अमेरिका आणि युरोपपेक्षा चार पट जास्त भारतात आहे . 

Nov 22, 2015, 01:30 PM IST

#मंत्रिमंडळनिर्णय - सिगारेट, दारूवरी कर वाढला, 'अमृत' योजनेला मंजुरी

राज्य सरकारनं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सिगरेट, विडी, दारुवर पाच टक्के अतिरिक्त कर लावला जाणार आहे. दुष्काळनिधीसाठी सिगरेट, विडी, दारु, शितपेय, पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवला असल्याचं सरकारनं सांगितलंय.

Sep 30, 2015, 04:49 PM IST

महाराष्ट्रात खुल्या सिगारेटच्या विक्रीस बंदी

महाराष्ट्र सरकारने खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खुल्या सिगारेटवरील विक्रीवर सरकारकडून पुन्हा एकदा कठोर भूमिका घेण्यात आली आहे. 

Jun 2, 2015, 08:12 PM IST

रस्त्यावर दम माराल तर दंड हजार रूपये

केंद्र सरकारने धूम्रपानविरोधी कायदा अधिक कडक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं निर्णय घेतलाय.

Jan 14, 2015, 09:39 AM IST

मासिक पाळी दरम्यान वाढते धुम्रपानाची इच्छा

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार मासिक पाळीदरम्यान महिलांमध्ये धुम्रपान करण्याची इच्छा खूप वाढते, असं सांगण्यात आलंय. इतर दिवशी धुम्रपान सोडणं सोपं असतं. कारण मासिक पाळीदरम्यान शरीरात निकोटीनची गरज वाढते. 

Jan 6, 2015, 04:38 PM IST

लवकरच 'सुटी' सिगारेट मिळणार नाही

सुट्या सिगारेटविक्रीवर लवकरच बंदी येणार असल्याचं म्हटलं जात आहे. तरूणांमध्ये सिगारेट फुंकण्याची सवय मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यावरून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Nov 26, 2014, 08:50 AM IST

खुल्या पाकिटातून 1-2 सिगारेट घेणाऱ्यांनो ही बातमी वाचा!

जर आपल्याला सिगारेटचं व्यसन आहे. पानाच्या टपरीवरून खुल्या पाकिटातून 1-2 सिगारेट विकत घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Nov 25, 2014, 05:24 PM IST

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २० हजारांचा दंड?

देशात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन कमी व्हावं यासाठी लवकरच कठोर नियमावली येण्याची चिन्हं असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास तब्बल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच सिगारेटची सुट्या विक्री करण्यावरही निर्बंध घालावे, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आला आहे. 

Sep 10, 2014, 11:24 AM IST