सिक्सर किंग, युवी सिंग वर्ल्डकप खेळणार?
सिक्सर किंग युवराज सिंग त्याच्या चाहत्यांना टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळतांना पाहता येण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी युवीची निवड होऊ शकते.
Jul 5, 2012, 11:02 AM ISTटी-२०च्या आव्हानासाठी युवी सज्ज…
कॅन्सरसारख्या आजारातून सावरून भारतीय क्रिकेटफॅन्सच्या गळ्यातला ताईत बनलेला ‘युवी’चं लवकरच मैदानात आगमन होणार आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये होणाऱ्या विश्व ट्वेन्टी-२० खेळायची, त्याची स्वत: ची इच्छा आहे. या मॅचसाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार होणं हे एक आव्हान असल्याची त्यालाही जाणीव आहे. पण, त्याबरोबरच या मॅचसाठी आपण नक्कीच मैदानात उतरु, हा विश्वासही त्याच्या मनात आहे.
Jun 20, 2012, 05:33 PM ISTयुवी फिट, लवकरच मैदानात
भारताचा धडाकेबाज आणि अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग आता मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. गेले अनेक महिने कर्करोगाशी झुंज देणारा युवराजसिंग आता पूर्णपणे बरा झाला आहे.
Jun 5, 2012, 01:09 PM ISTयुवी खराखुरा 'फायटर' - इरफान
युवराज सिंग हा फक्त मैदानातलाच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातलाही योद्धा आहे असं मत टीम इंडियाच्या इर्फान पठाणने व्यक्त केलं आहे. २७ वर्षीय इर्फान पठाण सध्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सतर्फे खेळत आहे.
Apr 12, 2012, 05:19 PM ISTघरी पोहचल्याचा खूपच आनंद - युवी
घरी परतल्यावर सर्वाधिक आनंद होत असून आजारातून झपाट्याने बरा होत असल्याचे सिक्सर किंग्ज आणि जिगरबाज क्रिकेटर युवराज सिंग यांने मायदेशी परतल्यावर सांगितले.
Apr 9, 2012, 04:17 PM ISTवेलकम युवी, मायदेशात जोरदार स्वागत!
अमेरिकेत कॅन्सरवर यशस्वी उपचार झाल्यानंतर आणि लंडनमध्ये आराम केल्यानंतर भारताचा स्टार बॅट्समन युवराज सिंग आज भारतात परतणार आहे. सकाळी ९.३० वाजता युवराज दिल्लीत दाखल होणार आहे.
Apr 9, 2012, 10:04 AM IST९ एप्रिल रोजी युवी परतणार मायदेशी
युवराजच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. युवराज सिंग ९ एप्रिल रोजी भारतात परतणार आहे. मायदेशी परतल्यावर युवराज ११ एप्रिलला पत्रकार परिषद घेणार आहे. अमेरिकेतील टेक्सास येथे युवराज याच्या कँसरवर गेले काही महिने उपचार चालू होते.
Apr 6, 2012, 12:45 PM ISTयुवराज सिंग फिट
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला....सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर युवराजनं ही माहिती दिली आहे. केमोथेरपीच्या उपचारांचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती युवीनं ट्विटरवर दिली आहे
Mar 18, 2012, 12:03 PM ISTयुवीने केलं विराट कोहलीचं अभिनंदन
अमेरिकेमध्ये कँसरवर उपचार घेत असलेल्या युवराज सिंगने मंगळवारी विराट कोहलीचं अभिनंदन केलं आहे. विराट कोहली याने होबार्ट येथील वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १३३ धावा काढून भारताला विजय मिळवून दिला होता.
Feb 29, 2012, 10:28 AM ISTयुवराज सिंगचा ट्युमर जवळपास नष्ट
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक खूषखबर आहे. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आनंद होईल की युवराज सिंग याचा ट्युमर आता जवळपास नष्ट झाला आहे. ही माहिती युवीने स्वतः ट्विटरवर दिली आहे. युवराजवर सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये इलाज सुरू आहेत.
Feb 16, 2012, 01:08 PM ISTशेवटी केस गेले. पण, हिंमतीने जगतोय
टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंग याच्यावर सध्या अमेरिकेमध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरवरील इलाज चालू आहेत. इलाजादरम्यान त्याने आपले नवे फोटो शुक्रवारी ट्विटरवर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये युवराजचं डोकं मात्र भादरलेलं आहे.
Feb 10, 2012, 11:31 AM ISTयुवराजचा फिजिओ बोगस
युवराज सिंगचे फिजिओ जतिन चौधरी यांच्याकडे मान्यप्राप्त डिग्री नसल्याचा गौप्यस्फोट दिल्ली मेडिकल कौन्सिलनं केला आहे.
Feb 7, 2012, 01:12 PM ISTयुवराजला कॅन्सर, अमेरिकेत किमोथेरपी
युवराज सिंगवर अमेरिकेत किमोथेरपी करण्यात आली आहे. युवराज सिंग 18 जानेवारीलाच उपचार घेण्यासाठी अमेरिकेला रवाना झाला होता. त्याचप्रमाणे युवराजचे फिजिओ जतिन चौधरी यांनी युवीला कॅन्सर झाल्याच सांगितलं आहे
Feb 7, 2012, 11:57 AM ISTयुवराज करणार मेमध्ये मैदानावर ‘राज’!
अमेरिकेत केमोथेरपी घेत असलेला भारतीय स्टार बॅटसमन युवराज सिंग याला फुफुसांचा कॅन्सर नसून त्याच्या फुफुसांमध्ये एक ट्युमर आहे. हा ट्युमर काढणे शक्य आहे. त्यामुळे युवराज सिंग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मैदानात खेळण्यास सज्ज होईल, असा विश्वास युवराजवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
Feb 6, 2012, 06:24 PM ISTयुवराज सिंगला ट्युमरची लागण
युवराज सिंगला डाव्या फुप्फुसात ट्युमरची लागण झाली असल्यानेच त्याने वेस्ट इंडिज विरुध्दच्या एक दिवसीय सिरीजमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. युवराजने स्वत: आपण वेस्ट इंडिज विरुध्दच्या एक दिवसीय सिरीजसाठी उपलब्ध नसल्याचं जाही केलं आणि ऑस्ट्रेलियातील टेस्ट सिरीजसाठी संघात त्याचा समावेश करण्यात आला नाही.
Nov 26, 2011, 03:27 PM IST