ममता बॅनर्जी

‘बलात्कारासाठी ममता किती चार्ज करणार?’

सीपीएमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनीसूर रेहमान यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘रेपसाठी त्या स्वत: किती चार्ज करणार’ असा प्रश्न विचारलाय.

Dec 28, 2012, 04:09 PM IST

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे.एफडीआयच्या मुद्यावरुन युपीएचा घटक पक्ष तृणमुल काँग्रेसनं पाठिंबा काढल्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सरकार सामोरं जातंय. हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

Nov 22, 2012, 09:21 AM IST

युपीएविरोधात ममतादीदी आक्रमक

एफडीआयच्या मुद्यावरून केंद्र सरकार अडचणीत आलं आहे. सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याची घोषणा तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केलीय.

Oct 1, 2012, 04:15 PM IST

अखेर तृणमूलचा यूपीएशी काडीमोड

तृणमूल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. दुपारी साडेचारच्या सुमारास तृणमूलचे मंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी ७ रेसकोर्सला पोहचले.

Sep 21, 2012, 04:59 PM IST

आज दिल्लीत रंगणार महाभारत...

ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री आज आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा देणार आहेत.

Sep 21, 2012, 11:23 AM IST

मनमोहनवर नाही ‘ममता’... सपाचा दिलासा

गुरुवारी एफडीआयचा अध्यादेश जारी करून एफडीआयच्या निर्णयावर सरकार मागे हटणार नाही असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारनं घटक पक्षांना दिलाय. ममता बॅनर्जी यांच्या पाठींब्याची पर्वा करता यूपीए सरकारनं हे पाऊल उचललंय.

Sep 21, 2012, 11:08 AM IST

हे सरकार माझा फोन टॅप करतंय - ममता बॅनर्जी

केंद्र सरकारकडून फोन टॅप होत असल्याचा खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Sep 20, 2012, 08:25 PM IST

ममतांना कल्पना दिली होती - पंतप्रधान

तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मध्यस्ती करण्याची शक्यता असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ममताना आर्थिक सुधारणांचे मोठे निर्णय घेण्यापूर्वी कल्पना दिली होती, असे स्पष्टीकरण दिले आहे.

Sep 19, 2012, 12:32 PM IST

ममतांनी काढला केंद्र सरकारचा पाठिंबा

इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे सर्व सहा मंत्री राजीनामे देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्यात सांगितले.

Sep 18, 2012, 08:49 PM IST

ममतादिदी करणार युपीएचा फैसला

दिल्लीचा फैसला आज कोलकात्यात होणारय. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची संध्याकाळी कोलकात्यात बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढायचा की सरकारसोबत रहायचं याचा निर्णय ममता बॅनर्जी घेणार आहेत.

Sep 18, 2012, 01:18 PM IST

ममता युपीएला देणार `दे धक्का`

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगून युपीएला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे आज स्पष्ट झाले.

Sep 16, 2012, 03:05 PM IST

मीडियामुळे होतायेत बलात्कार - ममता बॅनर्जी

प्रसार माध्यमांमुळे बलात्कार आणि आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे खळबळजनक वक्तव्य करून ममतांनी रविवारी मीडियाला टार्गेट केले.

Aug 26, 2012, 11:54 PM IST

ममतांचा यू-टर्न, प्रणवदांना पाठिंबा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी यू टर्न घेत प्रणव मुखर्जी यांना आपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाचे यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

Jul 17, 2012, 06:05 PM IST

अन्सारींसाठी पंतप्रधानांची ममता दिदींकडे 'फिल्डिंग'!

उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारी यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी पंतप्रधानांनी प्रयत्न सुरु केलेत. त्यांनी याबाबत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी तसंच भाकप नेते ए.बी.वर्धन यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली.

Jul 12, 2012, 10:57 AM IST

तृणमूलचे राजीनामे खिशात, यूपीएचे दात घशात!

यूपीएमधील तृणमूल काँग्रेसच्या सातही मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्त सुदीप बंडोपाध्याय यांनी आज स्पष्ट केले. परंतु, राजीनामे दिले नसले तरी राजीनामे तयार असल्याची गुगली बंडोपाध्याय यांनी टाकून पुन्हा यूपीएचे दात घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे.

Jun 18, 2012, 08:24 PM IST