ब्रिटन

रॅन्समवेअरच्या 'पेट्या'नं उडवली युरोपची झोप

युरोपवर पुन्हा एकदा सायबर हल्ला झालाय. या सायबर हल्ल्यामुळे युरोपमधल्या बँक आणि कंपन्यांसह ब्रिटिश सरकारचं मंत्रालयही ठप्प झालंय.

Jun 28, 2017, 11:50 AM IST

ब्रिटनमध्ये निवडून आल्या २०० महिला

ब्रिटन निवडणुकीमध्ये भारतीय वंशाच्या प्रीत कौर गिल यांच्यासह २०० महिला उमेदवार निवडणून आल्या आहेत. हे पहिल्यांदाच झालं आहे की, ब्रिटनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिला निवडून आल्या आहेत. याआधी २०१५ मध्ये १९१ महिला उमेदवार निवडून आल्या होत्या.

Jun 10, 2017, 12:46 PM IST

थेरेसांचा अतिविश्वास नडला, बहुमत मिळवण्यात अयशस्वी

एखादी बऱ्यापैकी स्थिर अर्थव्यवस्था, स्थिर राजकीय स्थिती एखाद्या महत्वाकांक्षी राजकारणी व्यक्तीमुळे कशी अस्थिरतेच्या गर्तेत लोटली जाते यांचं उत्तम उदाहरण आज ब्रिटनमध्ये बघायला मिळतंय. आज जाहीर झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांमुळे ब्रिटीश संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. थेरेसा मे यांचा अतिधाडसी निर्णय ब्रिटीश जनतेला अनिश्चिततेच्या नव्या अंधारात लोटणारा ठरणार आहे.

Jun 9, 2017, 10:55 PM IST

ब्रिटनमध्ये आज मतदान

ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. मतदानाआधी जाहीर झालेल्या अंदाजांमध्ये थेरेसा मे यांच्या कॉन्झर्वेटीव पक्षाला पसंती मिळालीय.  

Jun 8, 2017, 10:39 AM IST

मॅनचेस्टरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट

मॅनचेस्टरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट

May 23, 2017, 01:40 PM IST

मॅनचेस्टरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान स्फोट, १९ जणांचा मृत्यू

ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झालाय. 

May 23, 2017, 08:19 AM IST

गांधीजींचा पोस्ट स्टॅम्प विकला ४ कोटींना

गांधीजींचे छायाचित्र असलेले भारतीय पोस्ट स्टॅम्प ब्रिटेनमध्ये ४ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. हे पोस्ट स्टॅम्प विकणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, आतापर्यंत पोस्ट स्टॅम्पला मिळालेली ही सर्वात मोठी किंमत आहे. हे ४ पोस्ट स्टॅम्प एका ऑस्ट्रेलियन कलेक्टरला विकण्यात आले आहेत.

Apr 20, 2017, 02:58 PM IST

ब्रिटनमध्ये मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका जाहीर

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत देशात मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या आहेत. 8 जून रोजी ब्रिटनमध्ये मतदान होईल. 

Apr 19, 2017, 09:06 AM IST

लिंगभेदी शब्दांचा वापर केल्यास ब्रिटनमधल्या विद्यार्थ्यांचे गुण जाणार

तुम्ही पुलिंगी किंवा स्त्रीलिंगी भेद दर्शवणारे शब्द वापरता का? उदाहरणार्थ, महापौर किंवा राष्ट्रपती. तुम्ही इंग्लंडमध्ये विद्यार्थी असाल आणि मॅनकाइंड, लेमॅन असे इंग्रजी शब्द तुमच्या निबंधात किंवा उत्तरपत्रिकेत वापरलेत, तर तुमचे मार्क आता थेट कापले जाणार आहेत. ब्रिटनच्या फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशननं याबाबत विद्यापीठांना विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देत हल युनिव्हर्सिटी, बाथ युनिव्हर्सिटी, कार्डिफ मॅट्रोपोलिटन युनिव्हर्सिटी या प्रतिष्ठित विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी निर्देश दिलेत. 

Apr 3, 2017, 10:59 PM IST

ब्रिटन कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारताकडे सोपवणार

 सुमारे ९ हजार कोटींचे बँकांचे कर्जबुडवून ब्रिटनमध्ये परागंदा झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटन भारताकडे सोपवण्याला मंजुरी दिली आहे. 

Mar 24, 2017, 06:30 PM IST

व्हिडिओ : ब्रिटन संसदेजवळ दहशतवादी हल्ला, हल्लेखोर ठार

ब्रिटन संसदेजवळ दहशतवादी हल्ला झालाय. हाऊस ऑउफ कॉमन्स नेता डेविड लिडिंगटन यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटन संसदेत एका पोलीस अधिकाऱ्याला चाकू मारण्यात आला. पोलिसांनी मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय. 

Mar 22, 2017, 09:47 PM IST

ब्रिटनमध्ये 3 पालकांच्या बाळाचा जन्म शक्य

मातृत्वाच्या गुणसुत्रामध्ये दोष असेल तर तो अपत्यामध्ये येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीचं गुणसूत्र वापरण्याची ही पद्धत आहे. 

Dec 15, 2016, 10:49 PM IST