गारपिट

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

Mar 12, 2014, 07:15 PM IST

संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पेंड्या फेकल्या

बुलडाणा जिल्ह्यातच गारपीटग्रस्त शेतक-यांचा संताप मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळाला. नुकसानग्रस्त शेतक-यांनी गाडीवर हरब-याच्या पेंडी फेकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

Mar 12, 2014, 07:08 PM IST

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

Mar 12, 2014, 03:47 PM IST

गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ, मोदी विदर्भ दौऱ्यावर

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्चला विदर्भाच्या दौ-यावर जाणार आहे. मोदी वर्ध्यात पांढरकवडा इथं चाय पे चर्चा हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या नेत्यांना आता कुठे खडबडून जाग आलीये. आता सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचार सभा रद्द केल्या आणि सुरू झाली गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ.

Mar 11, 2014, 08:27 PM IST

मुलीच्या लग्नाआधीच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.

Mar 10, 2014, 09:23 PM IST

निषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.

Mar 10, 2014, 08:23 PM IST