अँड्रॉईडवर BBM ‘लिक’, अॅपचं लाँचिग ढकललं पुढे!
ब्लॅकबेरीनं आपल्या बीबीएम सेवेचं अँड्रॉईडवरील लाँचिंग पुढं ढकलंलय. कारण, बीबीएमचं अधिकृत अँड्रॉईड अॅप कंपनीकडून लाँच होण्याआधीच त्याचं व्हर्जन लिक झालं आणि अवघ्या आठ तासांत १० लाख युझर्सनी ते इन्स्टॉलही केलं. ही बाब निदर्शनास येताच, कंपनीनं बीबीएमच्या अँड्रॉईड अॅपचं लाँचिंग पुढं ढकललंय.
Sep 23, 2013, 11:10 AM ISTखूशखबर!!! ब्लॅकबेरीचं बीबीएम अँड्रॉईड आणि आयफोनवर
स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी ब्लॅकबेरी मैदानात उतरतंय. आयफोन आणि अँड्रॉईडच्या स्पर्धेत काहीसं मागं पडलेल्या ब्लॅकबेरीनं आता आपलं वैशिष्ट्य असलेली बीबीएम म्हणजे ब्लॅक बेरी मेसेंजर ही सेवा आयओएस (i OS) आणि अँड्रॉईड (Android) या ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 19, 2013, 02:02 PM ISTआज लाँच होणार अॅपलचा iPhone 5S आणि iPhone 5C!
कॅलिफोर्नियामध्ये आज होणाऱ्या अॅपलच्या इव्हेंटमध्ये नवा आयफोन लाँच होणार आहे. आयफोन ५एस आणि आणि आयफोन ५सी हे अॅपलचे दोन फोन आज लाँच होण्याची शक्यता आहे. आयफोन ५सी हा आयफोनचा स्वस्त असा फोन असेल, असं सांगण्यात येतंय. मात्र तरीही दोन्ही फोनच्या किमतीत जास्त फरक नसेल,अशीही शक्यता वर्तविली जातेय.
Sep 10, 2013, 03:08 PM IST'आयफोन'नं घेतला तिचा जीव!
मोबाईलच्या दुनियेतील अग्रगणी समजली जाणारी कंपनी म्हणजे अॅपल.परंतु याच महागड्या कंपनीच्या आयफोनमुळे एक युवतीचा जीव गेलाय. अॅपलच्या आयफोनच्या चार्जिंगवेळी कॉल रिसीव्ह केल्यानंतर लागलेल्या विजेच्या झटक्याने एका युवतीचा मृत्यू झालाय
Jul 15, 2013, 12:01 PM ISTअॅपलचा पाच हजारांचा `जनता मॉडेल`!
स्मार्टफोनचं फॅडनं सध्या चांगलाच वेग घेतलाय. त्यामुळे कंपन्यांमध्येही कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त उपयुक्तकारक फिचर्स देणाऱ्या ‘स्मार्टफोन’ची स्पर्धा वाढतेय.
Jun 15, 2013, 02:48 PM IST