IPL 2021 : पाहा बलाढ्य पोलार्डशी भिडला प्रसिद्ध कृष्ण; खेळपट्टीवर तणाव

हा व्हिडीओ पाहून मैदानावर नेमकं काय झालं हे लक्षात येईल   

Updated: Sep 24, 2021, 09:09 AM IST
IPL 2021 : पाहा बलाढ्य पोलार्डशी भिडला प्रसिद्ध कृष्ण; खेळपट्टीवर तणाव title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई :  कोलकाता आणि मुंबईच्या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात गुरुवारी दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये खऱ्या अर्थानं एक संघर्ष पाहायला मिळाला. क्रीडारसिकांचं लक्ष त्या क्षणी हेरलं गेलं जेव्हा, जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णचा आवेग पाहायला मिळाला. 

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्ण तसा कायमच शांत असतो. मुळात तो याच स्वभावासाठीही ओळखला जातो. पण, यावेळी मात्र तो मुंबईच्या खेळाडूशी भिडताना दिसता. हा खेळाडू होता बलाढ्य कायरन पोलार्ड. 

मुंबईच्या संघाची फलंदाजी सुरु असताना 16 व्या षटकामध्ये प्रसिद्ध कृष्ण गोलंदाजी करत होता. त्यावेळी मुंबईकडून पोरलार्ड फलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पोलार्डनं एक फटका मारला आणि चेंडू सरळ प्रसिद्ध कृष्णकडे पोहोचला. यावेळी त्यानं लगेचच तो टीपत पोलार्डच्या दिशेनं (स्टंपवर मारण्यासाठी) फेकला. 

त्याची ही कृती पाहून पोलार्ड विकेटपासून दूर झाला. पण, कृष्णच्या हातचा चेंडू निसटला. तरीही तो पोलार्डच्या दिशेनं आवेगात पुढे गेला. त्याला असं करताना पाहून पोलार्डही बराच नाराज झाला आणि षटक संपल्यानंतर तो प्रसिद्ध कृष्णला काहीतरी बोलताना दिसला. खेळपट्टीवर यामुळं बराच तणाव निर्माण झाला होता. 

                                                                    

आयपीएल 2021 च्य़ा सत्रात गुरूवारी झालेल्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव (KKR beat MI) केला. मुंबईने 20 षटकांत 6 गडी गमावून 155 धावा केल्या. त्यांनी दिलल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरनं 3 गडी गमावून सहज विजय मिळवला.