Virat Kohli Gautam Gambhir : बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ (Lucknow Super Giants) यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) मध्ये शाब्दिक वादावादी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. सोमवारी झालेल्या या वादानंतरही अजून क्रिकेट विश्वासह सोशल मीडियावर या घटनेची चर्चा सुरु आहे.
बीसीसीआयने कोहली आणि गंभीर यांना या घटनेबाबत दोषी ठरवून ठरलं. या दोघांना प्रत्येक मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तर या दोघांमधील वादाचं मुळ असलेला लखनऊ संघाचा नवीन उल हकचीहीला मॅच फीच्या 50 टक्के शिक्षा देण्यात आली आहे. विराटला 1 कोटींचा दंडाची शिक्षा देण्यात आली असली तरी, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल. विराटला 1 रुपयांचंही नुकसान होणार नाही आहे. (Virat Kohli fined over 1 crore But not even a single rupee money is lost Gautam Gambhir ipl 2023)
विराटच्या आयपीएलमधील वार्षिक मानधनाबद्दल बोलायचं झालं तर त्याला 15 कोटी रुपये मिळतात. जर आरसीबीचा संघ हा प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही, तर तो किमान 14 सामने खेळेल. याचा अर्थ त्याला प्रत्येक मॅचमागी 1 कोटी एवढी रक्कम मिळते. तर त्याला 1.07 कोटी रुपये दंड ठोठवण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार असा दावा करण्यात आला आहे की, जर एखाद्या खेळाडूवर दंड ठोठवण्यात आला तर ती रक्कम फ्रँचायझी भरते. विशेष म्हणजे फ्रँचायझी ही रक्कम खेळाडूच्या पगारातून कापत नाही.