ICC Womens T20 World Cup 2023 : महिला टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसलाय . टीम इंडियाची सर्वात अनुभवी फलंदाज स्मृति मंधाना (Smriti Mandhana) पहिल्या सामन्यातून बाहेर झालीये. मंधानाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या प्रॅक्टिस सामन्यामध्ये फिल्डींग करताना दुखापत झालेली. त्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात ती खेळू शकणार नाहीये.
स्मृति मंधाना दुखापतीमुळे टीमबाहेर गेल्याने टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसलाय. मंधानाने 8 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या प्रॅक्टिस सामन्यातही भाग घेतला नव्हता. त्यामुळे ती पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता फारच कमी असल्याची चिन्ह आहेत.
पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना टीमचे कोच हृषिकेश कानिटकर यांनी माहिती दिली की, 'स्मृतीच्या बोटाला दुखापत झालीये. ती या दुखापतीतून बरं होण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे तिच्या खेळण्याची शक्यता नाही. सुदैवाची गोष्ट म्हणजे तिच्या बोटाला कोणतंही फ्रॅक्चर झालेलं नाही. आम्हाला अपेक्षा आहे की, ती दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.
कानिटकर पुढे बोलताना म्हणाले की, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्राय सिरीजदरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौरला झालेल्या खांद्याच्या दुखापतीतून ती पूर्णपणे बरी झालीये. त्यामुळे हरमन खेळण्यासाठी फिट आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तिने नेटमध्ये फलंदाजी केली.
दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगलेल्या वुमेंट टी-20 वर्ल्डकपमध्ये रविवारी टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचं दडपण दोन्ही टीमच्या खेळाडूंवर असणार आहे. अंडर-19 च्या मुलींनी नुकताच वर्ल्डकप जिंकून दिल्याने आता महिला देखील पूर्ण जोमाने मैदानात उतरणार आहेत.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड.