पर्थ : टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) वर कोणता संघ नाव कोरणार आहे, हे येत्या काही तासांत कळणार आहे. मात्र तत्पुर्वी सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. हा फोटो एका भारतीय फॅनचा (Indian fan) आहे. मात्र फायनल सामना पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये (Pak vs Eng) सुरू असताना भारतीय फॅनचा फोटो का व्हायरल होतोय? असा प्रश्न सहाजीक अनेकांना पडला आहे. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊय़ात.
हे ही वाचा : मैदानावरचा 'तो' क्षण... अन् पाकिस्तानच वर्ल्ड कप विजयाच स्वप्न भंगलं!
टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंडचे (Pakistan vs England) फॅन्स त्यांच्या त्यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडीअमवर पोहोचले आहेत. मात्र या फॅन्समध्ये एक फॅन भाव खाऊन गेला आहे. हा क्रिकेट फॅन भारतीय आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडच्या क्रिकेट फॅन्सपेक्षा त्या भारतीय फॅन्सची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाची (Team India) मॅच नसताना या सामन्यात एक भारतीय फॅन्स पोहोचला असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
फायनल सामन्यात या भारतीय फॅनचा (Indian fan) फोटो व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे, हा भारतीय फॅन पाकिस्तानच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानात उतरला आहे. या भारतीय फॅनच्या (Indian fan) हातात पाकिस्तानी झेंडा आहे आणि हा झेंडा फडकवून तो टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानला सपोर्ट करत आहे. या दरम्यान त्याचा एक फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोची एकच चर्चा आहे.
अनेकदा क्रिकेटच्या मैदानात खेळाडू स्पोर्टसमनशीप (Sportsmanship) दाखवताना दिसतात, मात्र प्रथमच क्रिकेटच्या मैदानात एका क्रिकेट फॅनने स्पोर्टसमनशीप (Sportsmanship) दाखवली आहे. त्यामुळे या भारतीय फॅनच्या स्पोर्टसमनशीपच कौतूक होतेय.
An Indian is holding a Pakistani flag in the finals Supporting Pakistan against England. #T20WorldCupFinal pic.twitter.com/QMyS4eMyLL
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) November 13, 2022
टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात पाकिस्तानने 8 विकेट गमावून 137 धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग आता इंग्लंड करत आहेत. इंग्लंडच्या 10 ओव्हरमध्ये 77 धावा झाल्या आहेत. आता त्यांना वर्ल्ड कपवर (T20 World Cup) नाव कोरण्यासाठी 61 धावांची गरज आहेत. तर पाकिस्तानला विजयासाठी 7 विकेटची गरज आहे.