Pak vs Aus, 3rd Test | लायनचा पाकवर जोरदार 'पंजा', ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर (Pak vs Aus, 3rd Test) 115 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. 

Updated: Mar 25, 2022, 05:37 PM IST
Pak vs Aus, 3rd Test | लायनचा पाकवर जोरदार 'पंजा', ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय  title=
छाया सौजन्य : आयसीसी

इस्लामाबाद : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर (Pak vs Aus, 3rd Test) 115 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 1-0 अशा फरकाने मालिका जिंकली आहे. रावलपिंडी आणि कराचीत झालेले पहिले दोन्ही सामने अनिर्णित राहिले. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी 351 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पाकिस्तानची पूर्ण टीम पाचव्या दिवशी तिसऱ्या सत्रात  235 धावांवर ऑलआऊट झाली. (pak vs aus 3rd test day 5 australia win 115 runs against pakistan and win series at gaddafi stadium at lahore)  
 
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने 83 धावा देत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानमधील तिसरा कसोटी मालिका विजय आहे. ऑस्ट्रेलिया 24 वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आली होती. ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे तिसरा सामना जिंकत दौऱ्याचा शेवट गोड केला. 

ऑस्ट्रेलियाने याआधी पाकिस्तानमध्ये 1998 मध्ये 1-0 फरकाने कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिला सामना डाव आणि 99 धावांनी जिंकला होता. तर दुसरा आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला होता.