Hardik Pandya च्या Birthday ला Natasha ची खास पोस्ट, शेअर केला 'तो' खासगी व्हिडीओ!

Hardik Pandya Birthday : Natasha Stankovic ने शेअर केली खास पोस्ट!

Updated: Oct 11, 2022, 06:22 PM IST
Hardik Pandya च्या Birthday ला Natasha ची खास पोस्ट, शेअर केला 'तो' खासगी व्हिडीओ! title=

Hardik Pandya Birthday : टीम इंडियाचा (Team India) स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याचा आज वाढदिवस आहे. जगभरातून हार्दिकवर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसतोय. हार्दिक पांड्या आणि अभिनेता, मॉडेल नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आता नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त नताशाने खास पोस्ट शेअर केली आहे.

हार्दिक पंड्या 11 ऑक्टोबरला त्याचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने इंस्टाग्रामवर (Natasha Stankovic Instagram Post) एक छान पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये नताशाने केशरिया (Kesariya) या प्रसिद्ध गाण्यावर हार्दिकसोबत घालवलेल्या क्षणांची क्लिप जोडून एक व्हिडिओ (Hardik Pandya Video) शेअर केलाय.

आणखी वाचा - T20 World Cup 2022 पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, 2 खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहोचलेच नाहीत!

या व्हिडिओमध्ये नताशा हार्दिकचा पूलसाइड रोमान्स पहायला मिळतोय (Hardik Pandya Natasha Stankovic Romantic Video) आणि हार्दिकचा मुलगा अगस्त्यसोबतचे मजेदार क्षण आहेत.  या सुंदर व्हिडिओसाठी हार्दिक नताशा कपलला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. नताशाच्या या व्हिडिओवर चाहते हार्दिकचे अभिनंदन (Hardik Pandya Birthday) करत आहेत.

पाहा Natasha ची पोस्ट - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@natasastankovic__)

व्हिडीओ शेअर करत नताशा म्हणते, "माझ्या जीवनसाथीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी चांदण्यासारखं चमकत रहा. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. आमचं तुझ्यावर खूप खूप प्रेम....". नताशाच्या या पोस्टवर हार्दिकने देखील कमेंट केली. Love you Baby म्हणत हार्दिकने नताशाच्या शुभेच्छा स्विकारल्या आहेत.