मुंबई : यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीने कर्णधार पद सोडलं आणि टीमची कमान रविंद्र जडेजाकडे सोपण्यात आली. मात्र टीममध्ये असे खेळाडू होते ज्यांना धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा होती.
असाच एक खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे. डेवॉन कॉन्वे यावर्षापासून चेन्नईच्या सोबत जोडला गेला होता. चेन्नई सुपर किंग्जने डेवॉन कॉन्वेचा एका व्हिडीयो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने धोनीसंदर्भातील एक किस्सा सांगितला आहे.
डेवॉन कॉन्वेने सांगितले की, मला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचं होतं. शिवाय यासंदर्भात मी पण त्याच्याशी बोललो. मी त्याला विचारलं की, खरचं तुम्ही अजून एकाही सिझनसाठी कॅप्टन्सी करणार नाही का. तेव्हा धोनीने उत्तर दिलं की, मी कर्णधार नसे, पण मी नेहमी तुझ्या आजूबाजूला असणार आहे.
डेवॉन कॉन्वे पुढे म्हणातो की, मी रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीसोबत बोललो. मी या दोघांसोबत जेवणंही केलं. हे दोन खेळाडू अगदी सामान्य आहेत. त्यांच्यासोबत मला फार छान वाटलं.
आयपीएल सुरु होण्याच्या अगदी 2 दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय सांगितला. त्यानंतर कर्णधारपदाची धुरा रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आली आहे. मात्र जडेजा कर्णधार म्हणून पहिल्याचा सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.