मुंबई : चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 151 धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 150 धावा केल्या. चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक 93 धावा केल्या. कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने 26 रन्स काढल्या. तर डेव्हॉन कॉनवेने 16 धावांचं योगदान दिलं. (ipl 2022 rr vs csk chennai super kings set 151 runs target to against rajsthan royals moeen ali shine at mumbai)
राजस्थानकडून युजवेंद्र चहल आणि Obed McCoy या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन आश्विन आणि ट्रेन्ट बोल्ट या दोघांनी 1 विकेट घेतली.
राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन-विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयसवाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय.
चेन्नई सुपर किंग्स : महेद्रं धोनी (कर्णधार -विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, अंबाती रायुडू, एन जगदीशन, मिचेल सॅंटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, मतीशा पतिरणा आणि मुकेश चौधरी.