Rinku Singh Buys House: भारतीय पुरुष क्रिकेट संघ आणि आयपीएलमधील कोलकाता संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग आता आलिशान घराचा मालक झाला आहे. त्याने त्याच्या स्वप्नातील घर येथे विकत घेतले आहे. अलीगढमधील ओझोन सिटी येथील गोल्डन इस्टेटमध्ये रिंकू सिंगने मोठं घर खरेदी केलं आहे. यासह आता रिंकू सिंगचा नवीन पत्ता ओझोन सिटीच्या गोल्डन इस्टेटमधील घर क्रमांक 38 असेल. रिंकू सिंगचे नवीन घर ५०० स्क्वेअर यार्डचे आहे. बुधवारी सकाळी सर्वप्रथम कोल तहसीलच्या नोंदणी कार्यालयात या नवीन घराची नोंदणी झाली. यानंतर, संध्याकाळी कुटुंबासह नवीन घराची चावी त्याला मिळाली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबिय व शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
रिंकू सिंगच्या नवीन घराचा पत्ता आता अलिगढच्या ओझोन सिटी गोल्डन इस्टेटमधील कोठी क्रमांक 38 हा आहे. रिंकू सिंगच्या या स्वप्नपूर्तीला शुभेच्छा देण्यासाठी शहरातील मान्यवरांनी उपस्थित होते. चाव्या मिळाल्यानंतर सर्व सदस्यांनी मिळून घराची रिबन कापली. यावेळी रिंकू सिंगचा भाऊ सोनू, बिट्टू, जीतू आणि बहीण नेहा सिंग आणि त्याच्या मित्रांनीही त्याला नवीन घर घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आयपीएल संघांनी गुरुवारी जाहीर केलेल्या रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत केकेआरने रिंकू सिंगला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआरने त्याला 13 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. 2022 च्या लिलावात केकेआरने रिंकू सिंगला 55 लाख रुपयांना खरेदी केले होते.यावरून त्याची फी 24 पट वाढल्याचा अंदाज बांधता येतो. रिंकू सिंगने केकेआरसाठी सर्वाधिक धावा केल्या आहे. रिंकूने 14 डावात 474 धावा केल्या आणि 6 वेळा नाबाद राहिला. त्याने येथे 4 अर्धशतके झळकावली आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचा टॉप 10 मध्ये समावेश आहे.
हे ही वाचा: एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!
केकेआरने 2018 च्या सिजनमध्ये रिंकू सिंगला पहिल्यांदा 80 लाख रुपयांना विकत घेतले. पण रिंकूसाठी तो सीजन काही खास नव्हता. पण त्याने आपल्या खेळाने संघ व्यवस्थापन आणि केकेआरच्या प्रशिक्षकांना प्रभावित केले होते. याच कारणामुळे 2019 मध्येही त्याला कायम ठेवण्यात आले होते. पण 2022 च्या सिजनपर्यंतही तो आपली ओळख निर्माण करू शकला नाही. त्यानंतर कर्णधार नितीश राणाने त्याचा आत्मविश्वास उंचावला आणि त्यानंतर रिंकू सिंग एका वेगळ्याच उंचीवर चढताना दिसला. त्याने आयपीएलच्या 5 हंगामात आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले आहेत.