मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वजण सध्या लॉकडाऊनमध्ये असतानाच या वेळेत आपआपल्या परिने स्वत:ला व्यग्र ठेवत आहेत. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू रवींद्र जडेजासुद्धा सध्या अशाच पद्धतीने लॉकडाऊनच्या या काळात आपल्या तलवारबादीचं कौशल्य सर्वांपुढे आणताना दिसत आहे.
सोशल मीडियावर जडेजाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो एखाद्या वीर योद्ध्याप्रमाणे तलवारबाजीचं त्याचं कौशल्य दाखवताना दिसत आहे. जामनगर येथील निवासस्थानी रवींद्र जडेजाचा हा अंदाज क्रीडारसिकांची मनं जिंकून गेला आहे.
सहसा क्रिकेटच्या मैदानात शतकी खेळी केल्यावर किंवा चेंडू सीमारेषेपलीकडे पाठवल्यानंतर जडेजाचा हा अंदाज सहसा पाहायला मिळतो. त्याच्या याच अंदाजाची झलक लॉकडाऊनच्या या काळात पाहायला मिळत आहे. जडेजाने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला त्याने साजेसं कॅप्शनही दिलं आहे. 'तलवारीची चमक काहीशी कमी होऊ शकते. पण, ती तिच्या धन्याचा हुकूम कधीच डावलणार नाही..... ', असं कॅप्शन लिहित त्याने #rajputboy हा हॅशटॅगही जोडला आहे.
A “SWORD” MAY LOOSE IT’S SHINE,BUT WOULD NEVER DISOBEY IT’S MASTER #rajputboy pic.twitter.com/kKyKQ9vSWk
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) April 12, 2020
सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनीच त्यावर व्यक्त होण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर यानेही त्याच्या या तलवारबाजीच्या कौशल्याची प्रशंसा केली.
गेल्या कित्येक दिवसांपासून प्रत्येजण या काळात कोरोनाशी लढा देत असतानाच त्यांच्यातील सुप्त कलागुणांनाही वाव देत आहेत. जडेजाचा एकंदर अंदाज पाहता, तुम्हीसुद्धा त्याच्यापासून प्रेरित या काळात कंटाळ्याला दूर सारत तुमच्यातील कलेला नक्की वाव द्या.