IND vs PAK, Virat Kohli : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवला जात आहे. 1 लाख 32 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे वर्ल्ड कपच्या सामन्याला रंगत आल्याचं पहायला मिळतंय. टॉस जिंकून रोहित शर्माने (Rohit Sharma ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तानने सावध सुरूवात केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोन सिनियर प्लेयर्सच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. अशातच आता टीम इंडियाचा किंग कोहली याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) पाकिस्तानला पहिला हादरा दिला. पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्लाह शफिकला एलबीडब्ल्यू करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर 12 व्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला दुसरा धक्का बसला. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) इमाम उल हकला 36 धावांवर बाद केलं. इमाम बाद झाल्यानंतर रिझवान मैदानात आला.
मैदानात आल्यानंतर रिझवान पहिला बॉल फेस करण्यापूर्वी टाईमपास करत होता. त्यावेळी विराटने त्याची शाळा घेतली. विराट हाताकडे पाहत किती वेळ लावतो याचं कॅलक्युलेशन करत होता आणि याची नोंद ठेवावी, असा इशारा देखील केला. त्याचा फनी व्हिडीओ (funny Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Virat Kohli questioning why Mohammed Rizwan is taking so much time to be ready #ViratKohli | #INDvsPAK | #INDvsPAK pic.twitter.com/LjdaEO8LaY
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) October 14, 2023
पाकिस्तानचा संघ | बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर