Babar Azam: वर्ल्डकप 2023 ( ICC Cricket World Cup 2023 ) पाकिस्तान क्रिकेट टीमला आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. नुकंतच अफगाणिस्तानने पाकिस्तान पराभव केलाय. या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमला सेमीफायनल गाठणं जवळपास कठीण झालंय. अशातच आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी पाक टीमचा कर्णधार बाबर आझमवर ( Babar Azam ) टीकास्त्र सोडलंय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बाबर आझमची कामगिरी कर्णधारपदाला साजेशी नाहीये.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ( ICC Cricket World Cup 2023 ) बाबर आझम फलंदाजीत विशेष कामगिरी करू शकलेला नाही. पाकिस्तान टीमचा माजी खेळाडू सिकंदर बख्तने बाबर आझमवर जोरदार टीका केली आहे. यावेळी सिकंदरने बाबरला ( Babar Azam ) स्वार्थी खेळाडू म्हटलंय. अफगाणिस्तानविरूद्धच्या पराभवानंतर बाबर आझमवर खूप टीका होत होत्या. अशातच आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी देखील बाबरला घरचा आहेर दिला आहे. त्याचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ( ICC Cricket World Cup 2023 ) पाकिस्तानने 5 सामने खेळले असून 3 सामन्यांमध्ये टीमला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी पाकिस्तान टीमचा माजी खेळाडू सिकंदर बख्तने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, बाबर आझम स्वार्थी आहे. तो केवळ स्वत:साठी खेळतो. मला त्यापेक्षा जास्त काही बोलायचे नाही. इम्रान खानने सरफराज अहमदला कर्णधारपदावरून हटवून बाबरला ( Babar Azam ) कर्णधारपदी नेमलं तेव्हा पाकिस्तान क्रिकेट एका अर्थाने उद्ध्वस्त केलं.
पाकिस्तान टीमचा विकेटकीपर फलंदाज सरफराज अहमदने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान टीमला चॅम्पियन बनवलं. मात्र असं असूनही त्याला कर्णधारपदावरून हटवून बाबर आझमला ( Babar Azam ) कर्णधार बनवण्यात आलं. बाबर आझमने पाकिस्तान संघाचे कर्णधारपद स्वीकारलं तेव्हापासून टीमची कामगिरी काही विशेष झाली नाहीये.
पाकिस्तान क्रिकेट टीम 2023 च्या वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023 ) स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकली नाही, तर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवलं जाऊ शकतं. कारण, 2022 च्या टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतरच बाबर आझमची ( Babar Azam ) कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार होती. मात्र वनडे वर्ल्डकपमध्येही ( ICC Cricket World Cup 2023 ) बाबर आझमला टीमच्या कर्णधारपदी कायम ठेवण्यात आलं.