हरभजनने गाण्यातून घडवले भगतसिंगच्या स्वप्नातील भारताचे दर्शन

भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग खूप काळापासून संघाबाहेर आहे.

Updated: Mar 21, 2018, 12:34 PM IST
हरभजनने गाण्यातून घडवले भगतसिंगच्या स्वप्नातील भारताचे दर्शन title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग खूप काळापासून संघाबाहेर आहे. असे जरी असले तरी हरभजन क्रिकेट आणि सामाजिक मुद्द्यांवर आपले मत नक्कीच मांडतो. हरभजन सिंग सोशल मीडियावर देखील अत्यंत अॅक्टीव्ह आहे. आपल्या या स्पिनर हरभजनला गाण्याची ही आवड आहे.

हरभजन शहीद भगतसिंगचा खूप मोठा फॅन आहे. २३ वर्षांचे असताना देशासाठी प्राणार्पण करणारे भगतसिंग यांना श्रद्धांजली देण्यासाठी हरभजनने एक गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्याने शहीद-ए-आजम ची खासियत आणि मुल्य तरुणांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.

हरभजनचे हे गाणे ५ मिनिट ९ सेकंदाचे आहे. या गाण्यात भगतसिंगच्या स्वप्नातील देश साकारण्याचे आवाहन तो करत आहे. 

हरभजनच्या या गाण्याचे कौतुक करत विराट कोहलीने लिहिले की, शानदार आणि अगदी खरे आहे भज्जू पा.

व्ही.व्ही. लक्ष्मणनेही हरभजनच्या या कामाचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, शहीद भगतसिंग यांच्यासाठी शानदार श्रद्धांजली.

सचिन तेंडूलकरनेही केली स्तुती.

तर गौतम गंभीर म्हणाला की, भज्जी तुझा अभिमान आहे.