मुंबई : राजस्थाननं बंगळुरूवर 29 धावांनी विजय मिळवला. आयपीएलमधील 39 व्या मॅचमध्ये बंगळुरूला पराभव स्वीकारण्याची वेळ आली. राजस्थान टीमला याचा मोठा फायदा पॉईंट टेबलवर झाला आहे. बंगळुरूला विजयासाठी 145 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र तेही टार्गेट पूर्ण करणं अवघड झालं.
बंगळुरूच्या पराभवानंतर फाफ ड्यु प्लेसीस रागावला होता. बंगळुरू टीमचं कुठे चुकलं याबाबत त्याने विधान केलं आहे. यासोबत कोहलीच्या खराब फॉर्मवरही त्याने उत्तर दिलं.
बंगळुरूच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाज जास्त धावा करण्यात अपयशी ठरले. इतकच नाही तर खराब फिल्डिंगचा फायदा राजस्थान टीमने घेतला. त्यामुळे राजस्थान टीमला बंगळुरूवर विजय मिळवणं अधिक सोपं झालं. फाफ ड्यु प्लेसीसने विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर वक्तव्य केलं.
बंगळुरूच्या लाजीरवाण्या पराभवानंतर फाफ ड्यु प्लेसीस टीमवर संतापला. त्याने पराभवाचं खापर टॉप ऑर्डरच्या फलंदाजांवर फोडलं. खराब फिल्डिंग आणि कॅच सोडल्यामुळे राजस्थानच्या फलंदाजांना फायदा झाल्याचा दावा फाफने केला.
विराट कोहली सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे. त्याने टीममधून बाहेर बसावं असं आम्हाला कोणालाही वाटत नाही. हा आत्मविश्वासाचा खेळ आहे. एवढा महान खेळाडू टीममधून बाहेर जावा असं आम्हाला वाटत नाही असं म्हणत फाफने कोहलीची बाजू घेतली आहे.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने विजयाचं श्रेय रियान परागला दिलं आहे. या विजयाचा खरा हिरो रियान पराग असल्याचं म्हटलं आहे. बंगळुरूला पराभूत करून राजस्थान पॉईंट टेबलवर पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.