Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली चर्चेत आहे. आता विराट कोहलीशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. मुंबईतील विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये (One8 Commune) एका व्यक्तीला आत जाण्यापासून रोखण्यात आल्याने नवा वाद सुरु झाला आहे. याचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर आता नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli Viral Video) रेस्त्रॉमध्ये कपड्यांमुळे प्रवेश मिळू शकला नाही, असा दावा या व्यक्तीने केला आहे.
एका अज्ञात व्यक्तीने दावा केला आहे की, त्याला विराट कोहलीच्या मुंबईतील जुहू येथील वन8 कम्युन या रेस्त्रॉमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, लुंगी परिधान केलेल्या व्यक्तीने दावा केला आहे की त्याच्या पोशाखामुळे त्याला प्रवेश नाकारण्यात आला. वन8 कम्युन रेस्त्रॉमध्ये कपड्यांमुळे प्रवेश मिळू शकला नाही, असा दावा तामिळनाडूतील या तरुणाने केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
तामिळनाडूचा हा तरुण जुहूच्या वन 8 रेस्त्रॉच्या बाहेर उभा राहून व्हिडिओ बनवत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढरी लुंगी घातली आहे. 'हे श्री विराट कोहलीचे जुहू येथील रेस्त्रॉ आहे. जे डब्ल्यू मॅरियट जुहू येथे चेक इन केल्यानंतर मी वन8 कम्युन रेस्त्रॉमध्ये आलो होतो. प्रसिद्ध ब्रँडचे कपडे घातल्यानंतरही रेस्त्रॉ व्यवस्थापनाने मला प्रवेश दिला नाही आणि मी घातलेले कपडे त्यांच्या ड्रेस कोडमध्ये समाविष्ट नसल्याचे त्याने सांगितले. मोठ्या निराशेने, मी माझ्या हॉटेलकडे परतलो. ते या प्रकरणी कारवाई करतील की नाही माहीत नाही, पण अशी प्रकरणे पुन्हा होणार नाहीत, अशी आशा आहे. मी योग्य तमिळ सांस्कृतिक पोशाख परिधान केला आहे. रेस्त्रॉ व्यवस्थापनाने संपूर्ण तामिळ समाजाचा आणि आपल्या संस्कृतीचा अपमान केला आहे,' असे तमिळनाडूतील व्यक्तीने म्हटलं आहे.
Person with Veshti was not allowed in @imVkohli 's Restaurant
Very nice da pic.twitter.com/oTNGVqzaIz
— உன்னைப்போல் ஒருவன் (@Sandy_Offfl) December 2, 2023
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट कोहलीच्या हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकारावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने विराट कोहलीला आपल्या रेस्टॉरंटमध्ये भारतीय पारंपारिक पोशाखांना परवानगी न दिल्याने लाज वाटली पाहिजे, असे म्हटले आहे. मात्र, काही युजर्सनी या तरुणावर प्रश्नही उपस्थित केले आहेत. तो तरुण माईक आणि कॅमेरा घेऊन पूर्ण तयारीनिशी आला असल्याचं एका युजरने म्हटलं आहे. आणखी एका युजरने माझे वैयक्तिक मत आहे की ड्रेस कोडचे पालन केले पाहिजे, असं म्हटलं आहे. एका युजरने थेट विराट कोहलीला विचारले की, "विराट भारतीय संस्कृतीचा इतका तिरस्कार का करतो? विराट कोहलीच्या वन8 कम्युनमध्ये स्कलकॅप घातलेला पुरुष किंवा हिजाब घातलेली स्त्री किंवा बिकिनी/क्रॉप टॉप घातलेल्या महिलेला परवानगी आहे. पण पारंपारिक वेष्टी/लुंगी घातलेल्या व्यक्तीला परवानगी नाही. विराट भारतीयांचा द्वेष का करतो?, असा सवाल केला आहे.