क्रिकेटर युवराज सिंहच्या आईला धमकी; '40 लाख द्या नाहीतर...'

Yuvraj Singh Mother Threatened: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर युवराज सिंह याच्या आईला धमकी (Extortion Case) देण्यात आल्याची धक्कादायक समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे 40 लाख रुपये देखील मागण्यात आल्याचं समोर आलंय.

Updated: Jul 25, 2023, 11:55 PM IST
क्रिकेटर युवराज सिंहच्या आईला धमकी; '40 लाख द्या नाहीतर...' title=
Yuvraj Singh Mother Extortion Case

Yuvraj Singh Mother Extortion Case: टीम इंडियाचा वर्ल्ड कप जिंकवून देणारा माजी स्टार ऑलराऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) यांच्या परिवारासोबत धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. युवराज सिंह याची आई शबनम सिंह (Shabnam Singh) यांना एका महिलेने 40 लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर संपूर्ण परिवाराची बदनामी करेल, अशी धमकी देखील देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी (Gurugram Police) दिली आहे. या प्रकरणी गुरुग्राममधील डीएलएफ फेज-1 पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

हेमा उर्फ डिंपी असं आरोपी महिलेचं नाव आहे. आरोपी महिलेने शबनम सिंह (Yuvraj Singh Mother) यांना बदनामी करण्याची धमकी देऊन 40 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर शबनम सिंह यांनी पोलिसांकडे धाव घेतली. युवराजच्या आईने पैसे जमा व्हावेत म्हणून आरोपी महिलेकडे काही दिवसांचा अवधी मागितला होता. 5 लाख देण्याचं ठरल्यानंतर पोलिसांनी फिल्डिंल लावली अन् आरोपी महिलेला रंगेहात अटक केली. 

महिलेने पैसे का मागितले?

आरोपी महिलेला युवराज सिंगचा भाऊ (Zoravar Singh) जोरावर सिंगच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. युवराज सिंग याचं घर डीएलएफ फेज-1 मध्ये आहे. परंतु आरोपी महिलेला 20 दिवसांच्या आत कामावरून काढून टाकण्यात आलं. युवराजचा भाऊ जोरावर सिंह डिप्रेशनमधून जात होते आणि त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आरोपी महिलेला केअरटेकर म्हणून ठेवण्यात आलं होतं. मात्र, युवराजच्या भावाला तिच्या जाळ्यात अडकवू लागली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कुटुंबाला त्रास देण्यासाठी महिला युवराजच्या आईला मेसेज आणि कॉल करून धमकी देत होती. कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवून संपूर्ण कुटुंबाची बदनामी करेन, अशी धमकीही आरोपी महिला द्यायची. जर तुम्हाला बदनामी टाळायची असेल तर तुम्हाला 40 लाख रुपये द्यावे लागतील, असं म्हणत पैसे उकळण्याचा डाव आखला गेला. मात्र, प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर तिला रंगेहात पकडण्याचं ठरवलं.

आणखी वाचा - ICC ODI World Cup 2023 : ' म्हणून टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही', खळबळजनक भविष्यवाणी करत युवराज सिंग ने ठेवलं वर्मावर बोट!

दरम्यान, सुरुवातीला 5 लाख रुपये देण्याची चर्चा झाली. आरोपी महिलेने कबुल देखील केलं. पोलिसांनी आरोपी महिलेच्या मुसक्या आवळ्या. त्यानंतर आता महिलेला जामीन मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर पोलीस या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी करत आहेत.