मुंबई : आशिया कप 2022 ला (Asia Cup 2022) आजपासून सुरूवात होत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा (team india) पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडिया मैदानात घाम गाळताना दिसत आहे. दरम्यान हे सर्व सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) पत्रकार बनल्याचे दिसुन आले. या संबंधित व्हिडिओ देखील समोर आला आहे.
पाकिस्तान विरूद्ध सामन्यासाठी टीम इंडिया (team india) मैदानात कसून सराव करत आहे. या संबंधित फोटोही समोर आले आहेत. त्यातच आता रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मैदानात प्रॅक्टीस करतानाचा आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा पत्रकारालाच प्रश्न विचारताना दिसतोय.
व्हिडिओत काय?
रोहित शर्मा (Rohit sharma) बांऊड्री लाईनवर उभा आहे, त्याच्यासोबत युझवेंद्र चहल (yuzvendra chahal) आहे, आणि एक क्रिकेट स्टाफ आहे. यावेळी रोहित पत्रकाराला चहल आणि धनश्री यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या कोणी पसरवल्या याबाबत प्रश्न विचारताना दिसत आहे. या प्रश्नाला पत्रकार उत्तर देतोय,
रोहित शर्माच्या (Rohit sharma) प्रश्नावर पत्रकार म्हणाला, ती बातमी आम्ही पसरवली नाही, तर आम्ही फक्त प्रश्न विचारला होता, नंतर युझवेंद्र चहलने बोलला होता, असे तो म्हणतोय. या संभाषणाचा हा व्हिडिओ असून तो व्हायरल झाला आहे.
Rohit Sharma asking journalists on who started the fake rumours on Yuzvendra Chahal's personal life. pic.twitter.com/A6V9fkz9R1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 27, 2022
दरम्यान काही दिवसांपूर्वीच युझवेंद्र चहल (yuzvendra chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree verma) यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. धनश्रीने (Dhanashree verma) इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चहल आडनाव काढून टाकल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. यानंतर दोघांनी सोशल मीडियावरून या प्रकरणावरून स्पष्टीकरण दिले होते.