Arjun Tendulkar : वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आयपीएलमधील हा 54 सामना असणार आहे. आरसीबी विरूद्ध मुंबई (MI vs RCB) यांच्यापूर्वी झालेल्या सामन्यात कोहलीच्या टीमने रोहित सेनेचा (Rohit sharma) पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून बदला घेण्याचा प्रयत्न मुंबईची टीम करणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात प्लेईंग 11 कशी असणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मुंबईचा गेला सामना चेन्नईसोबत झाला. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 6 विकेट्सने पराभव केला. मात्र एकंदरीत मुंबईच्या गोलंदाजांची परिस्थिती पाहिली तर त्यांचं आक्रमण पहायला मिळालेलं नाही. असा विचार केला जाऊ शकत नाही की, प्रत्येक वेळी फलंदाज 200 स्कोर पार करून विजय मिळू शकेल. गेल्या काही सामन्यांमध्ये गोलंदाज फारच खर्चीक ठरलेले दिसतायत.
कोलकाताविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) डेब्यू केलं होतं. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यामागील कारण म्हणजे, पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने एका ओव्हरमध्ये 31 रन्स दिले होते. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने अर्शद खानला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली.
अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) टीममधून डावलल्यानंतर रोहितने अर्शद खानला (Arshad Khan) संधी दिली. यावेळी अर्शदने 3 विकेट्स घेतले आणि 39 रन्स खर्च केली. दुसरीकडे पंजाबकिंग्जविरूद्धच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 48 रन्स दिले आणि एक विकेट काढली. यानंतर चेन्नईविरूद्धच्या सामन्यात 1.4 ओव्हरमध्ये 28 रन्स दिले.
पंजाब किंग्जविरुद्ध त्याने 4 षटकात 48 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. त्यानंतर CSK विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अर्शदने केवळ 1.4 षटकात 28 धावा दिल्या. म्हणजेच तिन्ही सामन्यांमध्ये त्याची अर्थव्यवस्था अतिशय बिकट होती. यामुळेच आता रोहित शर्मा अर्जुन तेंडुलकरला परत मिळवू शकतो. एकंदरीत तिन्ही सामन्यात सरासरी पाहिली तर त्याचाही रेकॉर्ड फारसा चांगला नाहीये. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहित अर्जुनला संधी देऊ शकतो.
कोलकाताविरूद्धच्या सामन्यात डेब्यू केल्यानंतर हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने त्याच्या आयपीएल करियरमधील पहिली विकेट काढली. अर्जुनने आतापर्यंत आयपीएलमधील 4 सामने खेळले असून 3 विकेट्स काढण्यात त्याला यश मिळालयं. यासोबत तो एकदा फलंदाजीलाही उतरला होता. यावेळी 9 बॉल्समध्ये अर्जुनने 13 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये एका सिक्सचाही समावेश होता.
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, डेवाल्ड ब्रेविस/ट्रिस्टन स्ट्रब्स, टिम डेविड, कॅमरन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, पीयूष चावला, आकाश मधवाल