Mantra Benefits : प्रत्येकाला आपल्या दिवसाची सुरुवात चांगलीच हवी असते. शास्त्रानुसार जर सकाळची सुरुवात सकारात्मक असेल तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल अशी मान्यता आहे. जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी सकाळी वेळेवर उठणे, रात्री वेळेवर झोपणे आणि वेळेवर खाणे खूप महत्वाचे असते. यासोबतच काही मंत्राचा जप करणे तेही तेवढेच महत्त्वाचे असतो. आज आम्ही तुम्हाला असा मंत्र सांगणार आहोत, ज्याचा जप केल्याने जीवनात सुख-समृद्धी येईल.
हिंदू धर्मानुसार (Hinduism) काही मंत्र प्रत्येक संकट आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी मानले जाता. तर धार्मिक श्रद्धेनुसार किंवा मंत्रांमध्ये दैवीची शक्ती असते. म्हणूनच मंत्राचा नियमित जप करणे फायदेशीर ठरतो. तसेच कोणत्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजेसोबत त्यांच्या मंत्रांचा जप (Mantra chanting) करणे खूप महत्त्वाचे असते. हिंदू धर्मात असा समझ आहे की जर मंत्र योग्य पद्धतीने आणि उच्चाराने जपला तर माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असाच एक मंत्र आहे. जर एखाद्याने गोपनीय मंत्राचा नियमित 24 मिनिटे जप केला तर त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले. या मंत्राचा जप पुढील 21 दिवस केला तर जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
वाचा: उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!
जन्माला येताना प्रत्येक व्यक्ती भाग्यवान असते असं नसतं. कधी-कधी नशिबाच्या कमतरतेमुळे मेहनत करूनही माणसाला त्या सुख-सुविधा मिळत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार पूर्ण फळ मिळत नसेल तर दोष नशिबाला लागतो. अशा परिस्थितीत भाग्य उजळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक मंत्र सांगण्यात आला आहे. तो जर मंत्र जपला तर तुमच्या चिंता दूर होतील.
'ॐ ऐं श्रीं भाग्योदय कुरु कुरु श्रीं ऐं फट्', या मंत्राचा जप झोपण्यापूर्वी केला तर तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतो. तसेच या मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा. तुमच्या इच्छेनुसार 21 किंवा 51 वेळा देखील हा मंत्र जपू शकता. या मंत्राचा सतत 21 दिवस जप केल्याने तुम्हाला चमत्कार जाणवेल. तसेच या मंत्राचा जप करण्यापूर्वी हात पाय धुवावेत आणि त्यानंतरच जपासाठी बसावे. मंत्राचा उच्चार केल्यानंतर जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.