Ketu Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये केतूलाही (Ketu Transit) राहूप्रमाणे मायावी ग्रह म्हटलं जातं. त्यामुळे यांना पापग्रहांचा दर्जा देण्यात आला आहे. राहू हा कोणत्याही राशीचा स्वामी नाही. ज्योतिषांनुसार केतु हा मंगळाप्रमाणे फळ देणारा ग्रह आहे. मुख्य म्हणजे, केतु आणि राहु (Rahu) हे दोन्ही ग्रह राशीचक्रामध्ये उलट्या दिशेने मार्गक्रमण करतात.
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर मंगळ चांगला असेल तर त्याच्या केतूला चांगलं फळ मिळतं. राहू आणि केतु (Ketu Transit) या दोन्ही ग्रहांची कधीच युती होत नाही. येत्या 30 ऑक्टोबर 2023 रोजी जेव्हा केतू ग्रह हा तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या काळात काही राशीच्या व्यक्तींचं नशीब उजळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या.
या राशीच्या लोकांसाठी सहाव्या घरात केतूचं गोचर (Ketu Transit) होणार आहे. या गोचरमुळे वैवाहिक जीवनात गोडवा येणार आहे. याशिवाय तुमचे कोणी शत्रू असतील तर त्यावर विजय तुम्हाला विजय मिळवता येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणा सदस्याकडून तुमची मोठी प्रगती होऊ शकते. ज्या व्यक्तींना परदेशी जावसं वाटतंय, त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.
या राशीच्या व्यक्तींसाठी केतूचं गोचर (Ketu Transit) तिसऱ्या घरात होणार आहे. केतूच्या या गोचरमुळे तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना उत्तम प्राप्त होणार आहे. शिवाय तुम्हाला चांगला नफा देखील मिळण्याची चिन्ह आहेत. मालमत्तेसंदर्भात सुरू असलेला वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मोठ्या धार्मिक प्रवासामध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही नवीन काम सुरू करू शकता.
या राशीच्या व्यक्तींसाठी अकराव्या घरात केतूचं गोचर (Ketu Transit) होणार आहे. केतूच्या या गोचरमुळे बरेच दिवस रखडलेलं तुमचं काम पूर्ण होऊ शकणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा नोकरीमध्ये प्रमोशनही मिळू शकतं. तसंच कामाच्या ठिकाणी मोठी उद्दिष्टं पूर्ण होऊ शकणार आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या अपेक्षाही पूर्ण होऊ शकतात.
(Disclaimer: वरील लेखामध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)