Margashirsha Purnima 2023 : हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. या वर्षातील शेवटची पौर्णिमा ही 26 डिसेंबर मंगळवारी आहे. या तिथीला मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त गुरुंची जयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्रात दत्त जयंतीचा मोठा उत्साह असतो. पौर्णिमेला स्नान आणि दानला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार सत्ययुगाचा काळ हा मार्गशीर्ष पौर्णिमेपासून सुरु होतो अशी मान्यता आहे. या दिवशी शुक्ल आणि ब्रह्य योगसह अनेक शुभ योग आहेत. त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंती काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Dutt Jayanti and Margashirsha Purnima will bring Haris grace these zodiac or rashi signs financial benefits along with progress)
मिथुन राशीच्या लोकांसाठी वर्षातील शेवटची पौर्णिमा या राशीसाठी शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी संपत्तीचा वर्षाव करणार आहे. त्यामुळे तुमची धनसंपदा वाढणारी ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी दान करणे शुभ ठरले जाईल.
सिंह राशीच्या लोकांना वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेच्या दिवशी भाग्यशाली ठरणार आहे. काही नवीन कामं तुमच्या हिताचे ठरणार आहे. व्यवसायात मोठा नफा होणार आहे. सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी सत्यनारायण कथा वाचणे शुभ ठरणार आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी वर्षातील शेवटची पौर्णिमा फलदायी ठरणार आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळणार आहे. तूळ राशीच्या लोकांनी पौर्णिमेच्या दिवशी स्नान करुन दान करणं शुभ ठरेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेच्या दिवसापासून शुभ असणार आहे. नोकरीत वढती मिळणार आहे. पैशाची कमतरता दूर होणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)