मुंबई : बल्गेरियाचे बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांवर (baba vanga predictions list ) अनेकदा चर्चा होते. त्यांनी केवळ आपल्या देशाविषयीच नव्हे तर भारतासह (India) संपूर्ण जगाविषयी भाकीत केलं. भारताबाबत बाबा वेंगा ((baba vanga) यांच्या एका भविष्यवाणीने लोकांची चिंता वाढवली आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की 2022 मध्ये भारतात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी अनेक भाकितं केली, त्यापैकी 2 आतापर्यंत खरी ठरल्या आहेत.
द सनच्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनी भारताबाबत एक भयावह भविष्यवाणी केली. त्यांनी सांगितलं होतं की 2022 मध्ये जगभरातील तापमानात घट होईल, ज्यामुळे किटकांचा प्रादुर्भाव वाढेल. (baba vanga predictions 2022)
2022 मध्यी किटक भारतावर हल्ला करतील, ज्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान होईल, ज्यामुळे देशात दुष्काळ पडेल. भारतात तीव्र उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 2020 मध्ये किटकांनी राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातील पिकांवर हल्ला करुन सर्व पिकांचं नुकसान केलं.
बाबा वेंगा यांनी 2022 वर्षासाठी 6 (baba vanga 6 predictions) भाकितं केली होती, त्यापैकी 2 आतापर्यंत खरी ठरत आहेत. यानंतर बाबा वेंगाचे इतर 4 भाकितेही खरे ठरण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
बल्गेरियात राहणारे अंध वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ते आहेत. असे म्हणतात की दृष्टी नसतानाही त्यांना भविष्य स्पष्टपणे सांगता येतं. त्यांची आतापर्यत अनेक भाकीते खरी ठरल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भविष्यवाण्या या मनुष्य आणि धरतीचा र्हास करणाऱ्या असल्याने मानव जातीला मोठा धोका निर्माण झाला आहे.