Astro Tips: गुबगुबित गालाचे पुरुषांचं नशीब... पाहा सामुद्रिक शास्त्र काय सांगते?

सामुद्रिक शास्त्रानुसार महिला असो किंवा पुरुष त्यांचे नशीब हे त्यांच्या गालावर ही अवलंबून असते. मग जाणून घेऊ गुबगुबित गाल असणाऱ्या लोकांचे नशीब...

Updated: Oct 2, 2022, 07:22 PM IST
Astro Tips: गुबगुबित गालाचे पुरुषांचं नशीब... पाहा सामुद्रिक शास्त्र काय सांगते? title=
Astro Tips Men with chubby cheeks are lucky see what the oceanography says nz

Astro Tips: सगळा खेळ नशीबाचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शरीराचा प्रत्येक अवयव नशीबाबद्दल सांगतात. सामुद्रिक शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आज आम्ही तुम्हाला गुबगुबित गालांच्या पुरुषांचे आणि स्त्रीयांचे नशीब सांगणार आहोत. (Astro Tips Men with chubby cheeks are lucky see what the oceanography says nz)

प्रत्येकाचे सौदंर्य वेगवेगळे असते. तसंच गालांच्या बाबतीत ही आहे. गालांचा आकार, रंग त्वचा प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्यातच वैशिष्टय असते. सामुद्रिक शास्त्रानुसार महिला असो किंवा पुरुष त्यांचे नशीब हे त्यांच्या गालावर ही अवलंबून असते. मग जाणून घेऊ गुबगुबित गाल असणाऱ्या लोकांचे नशीब...

 

पुरुष

1. गुबगुबीत गाल असणार्‍या पुरुषांना सहज यश मिळते आणि कौटुंबिक सुख  ही अधिक असते.

2. गुबगुबीत गालाचे पुरुष खर्च करताना फारसे विचार करत नाही अशाने त्यांची आर्थिक गणिते बिघडलेली पाहायला मिळतात.

3. ज्या पुरुषांचे गाल आत असतात त्यांना कामाच्या ठिकाणी नावलौकीक मिळवण्यास जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नसते.

4.  काही पुरुष तर असे ही असतात त्यांना संपत्ती किंवा नाव कमवायला शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. 

आणखी वाचा - Personality Test: तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य कपाळावरून जाणून घ्या , सिक्रेट माहिती आता आली समोर

स्त्रिया

1. गुबगुबीत गाल असणार्‍या महिलांच्या हातात चांगलाच पैसा टिकतो. 

2. गाल रखरखीत असल्यास त्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

3. गालावर सुरकुत्या असल्यास महिलांना आर्थिक समस्या फारशा असतात.

4. काही महिलांना पैसे कमवण्याची तीव्र इच्छा असते पण सततच्या येणाऱ्या अडचणींमुळे त्यांना पैसे कमवताना त्रास जाणवतो.

5. गुलाबी आणि गुबगुबीत गाल असलेल्या महिला भाग्यवान आसतात.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)