या ११ बॉलिवूड सेलिब्रिटीजनी आपले वजन केले कमी

मुंबई : रणदीप हुडा याने 'सरबजीत' या त्याच्या आगामी चित्रपटासाठी वर्क आऊटचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आणि बॉलिवूडमधील वजन घटवण्याच्या आणि वाढवण्याच्या ट्रेंडची पुन्हा चर्चा सुरू झाली.

Feb 06, 2016, 14:36 PM IST
1/11

करिना कपूर
आपल्या वजनाशी आणि शरीराशी प्रयोग करण्याची चर्चा करायची असेल, तर करीनाला विसरुन कसं काय चालेल? बॉलिवूडमध्ये 'साईज झिरो'चा ट्रेंड जर कोणी सुरू केला असेल तर करीनाने. तिच्या 'टशन' चित्रपटासाठी तिने हा लूक केला होता. तेव्हा तिच्या चित्रपटापेक्षा तिच्या लूक्सचीच जास्त चर्चा झाली होती.

2/11

आलिया भट
आलिया कधी धष्टपुष्ट होती असं नाही म्हणता येणार. पण, तरी थोडं बेबी फॅट मात्र तिच्याकडे नक्की होतं. 'शानदार' चित्रपटात तिला बिकिनी घालायची होती. त्यासाठी तिने तिची बॉडी शेपमध्ये आणली.

3/11

भूमी पेडणेकर
'दम लगा के हैश्या' हा तिचा पहिलाच बॉलिवूडमधील चित्रपट. आपल्या पदार्पणातच प्रस्थापित विचारांना बाजूला सारणारी म्हणून ती ओळखली जाते. या चित्रपटासाठी तिने भरपूर वजन वाढवलं होतं. विशेष म्हणजे आता हे सगळं वजन उतरवण्यातही ती यशस्वी झालीये.

4/11

परिणीती चोप्रा
परिणीतीने आत्तापर्यंत किती वेळा तिच्या वजनाशी प्रयोग केला याचा काहीच हिशोब नसेल. तिचे जितके चित्रपटही आले नाहीत त्याहीपेक्षा जास्तवेळा तिच्या या प्रयोगांची चर्चा झाली. काहीच दिवसांपूर्वी तिने तिच्या ट्विटर अकाऊंटर तिच्या नव्याने बनवलेल्या फिट अॅण्ड फाईन बॉडीचे जे फोटो टाकले होते त्याचीही चर्चा झाली होती.

5/11

विद्या बालन
विद्या ही आपला अभिनय आणि तिचे वजन या दोन्ही गोष्टींमुळे कायम चर्चेत असते. 'द डर्टी पिक्चर'मधील तिच्या भूमिकेसाठी तिने १२ किलो वजन वाढवले होते. आणि त्यानंतरच्या 'शादी के साइड इफेक्ट्स'साठी त्यात अजून भर घातली होती. विद्याचे वजन हा नेहमीच बी-टाऊनमध्ये एक चर्चेचा विषय राहिलाय.

6/11

सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा खरंतर भरपूर ओव्हरवेट होती. तिच्या या वजनाची आजही चर्चा होते. पण, तिचा हा प्रवास खूप प्रेरणादायी. तिच्या सल्लू भाईने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. बॉलिवूडमध्ये यायचं असेल तर वजन कमी करणं किती आवश्यक आहे, हे त्याने तिला समजावून सांगितलं. त्यावर तिने जबरदस्त मेहनत घेतली आणि वजन घटवून दाखवलं.

7/11

कतरिना कैफ
कतरिना सध्या तिच्या 'फितूर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. तिच्या एक्स्ट्रा स्लिम लूकची सर्वत्र चर्चा आहे. पण, बॉलिवूडमध्ये ती पहिल्यांदा आली तेव्हा ती अजिबात स्लिम नव्हती. पण, या क्षेत्रात रुळण्यासाठी तिने विशेष मेहनत घेतली.

8/11

शाहरुख खान
किंग खान शाहरुखचा 'ओम शांती ओम' कोणाकोणाला आठवतो. आयुष्यात पहिल्यांदा किंग खानने सिक्स पॅक अॅब्स कमावले होते. असे काहीतरी त्याने पहिल्यांदाच केल्याने त्याच्या या लूकचीच जास्त चर्चा झाली होती. 

9/11

सलमान खान
सल्लूभाईची बॉडी आणि त्याच्या मसल्स बॉलिवूडमध्ये नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरल्यायत. आता सध्या तो 'सुलतान'च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. त्यात तो बॉक्सरची भूमिका करणार आहे. बॉक्सर म्हटलं की शरीर कमावणं आलंच. त्यामुळे सलमानने नव्याने कमावलेल्या शरीराची सध्या त्याच्या फॅन्समध्ये चर्चा आहे.

10/11

आमिर खान
आमिर खान बद्दल काय बोलावं. आता त्याने किती वेळा वजन कमी केलं आणि पुन्हा वाढवलं, याचा हिशोब ठेवणंही कठीण आहे. त्याचं सरासरी वजन काढायचं झालं तर खूप गणित करावं लागेल. इतके वेळेस तो आपल्या वजनाशी प्रयोग करत असतो. गजनीमधील भूमिकेसाठी त्याने कमावलेल्या शरीराची खूप चर्चा झाली होती. आताही त्याच्या आगामी 'दंगल'मधील भूमिकेसाठी त्याने ३० किलो वजन वाढवलंय आणि त्यानंतर पुन्हा त्याला ते २५ किलोने कमी करायचंय.

11/11

रणदीप हुडा
रणदीपने त्याच्या आगामी 'सरबजीत' या चित्रपटासाठी केवळ २८ दिवसांत तब्बल १८ किलो वजन कमी केल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यांने त्यासाठी अन्न ग्रहण केले नाही. केवळ डाएटवर भर दिला होता, अशी सध्या चर्चा आहे. त्यासाठी त्याने डॉक्टरांचीही मदत घेतली होती. त्याच्या या नवीन अवतारात त्याला ओळखताही येत नाही.