1/8
2/8
3/8
इंग्रजांशी हातमिळवणी नाही...
वयाच्या केवळ 18 व्या वर्षी टीपूनं पहिलं युद्ध जिंकलं होतं. इंग्रजांसोबत भारतीय शासकही टीपूचे शत्रू बनले होते. परंतु, उल्लेखनीय म्हणजे कोणत्याही भारतीय शासकावर विजय मिळवण्यासाठी त्यानं इंग्रजांशी तडजोड किंवा हातमिळवणी केली नाही. (हैदराबादच्या निजामानं मात्र टीपूच्या विरुद्ध इंग्रजांशी हातमिळवणी केली)
4/8
5/8
टीपूच्या हातात 'राम' लिहिलेली अंगठी
मुस्लीम शासक असला तर टीपू सुलतानच्या हाताच्या बोटामध्ये 'राम' असं अक्षर लिहिलेली अंगठी दिसत होती. टीपू सुलतान हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वीच या अंगठीचा लिलावदेखील पार पडला. लंडनमध्ये एक करोड रुपयांपेक्षा अधिक किंमतीत ही अंगठी विकली गेली.
6/8
विजय माल्याकडे आहे टीपू सुलतानची तलवार...
टीपू सुलतानची तलवार सध्या 'किंगफिशर'चा मालक विजय माल्या याच्याकडे आहे. लंडनमध्ये झालेल्या लिलावत माल्यानं टीपूची 200 वर्षांपूर्वीची एक तलवार पाच लाख पाऊंडपेक्षा अधिक रक्कम देऊन खरेदी केली होती.
या दुर्मिळ आणि ऐतिहासिक तलवारीवर कांस्याची मूठ आहे... याला वाघाच्या तोंडाचा आकार देण्यात आलाय. ही तलवार इंग्रजांना टीपू सुलतानच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरावर पडलेली सापडली होती.
7/8
खरं नाव फतेह अली टीपू
मैसूरचा सुलतान हैदर अली यांच्या घरी 20 नोव्हेंबर 1750 रोजी 'देवनहल्ली'मध्ये टीपूचा जन्म झाला. हे ठिकाण सध्या कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात आहे. टीपू सुलतानचं पूर्ण नाव फतेह अली टीपू असं होतं. टीपूच्या वडिलांनी दक्षिणेत आपल्या शक्तीच्या जोरावर विस्ताराला सुरुवात केली होती. याचमुळे इंग्रजांसोबत निजाम आणि मराठेही त्यांचे शत्रू बनले होते.
8/8