कंफर्म Run Out, फलंदाजही डग आऊटकडे रवाना, तरीही अम्पायर म्हणाले Not Out; हरमनप्रीत सिंगचा राडा, नेमकं काय झालं?

Women's T20 World Cup: रन आऊटच्या प्रयत्नात योग्य संवाद न झाल्याने चेंडू डेड घोषित करण्यात आला, त्यामुळे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर संतापली आणि अम्पायरशी वाद घातला.   

| Oct 05, 2024, 17:48 PM IST

Women's T20 World Cup: रन आऊटच्या प्रयत्नात योग्य संवाद न झाल्याने चेंडू डेड घोषित करण्यात आला, त्यामुळे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर संतापली आणि अम्पायरशी वाद घातला. 

 

1/9

महिला टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून, पहिल्याच सामन्यात रन-आऊटवरुन हरमनप्रीत कौरने मैदानात अम्पायरसोबत जोरदार राडा घातला.   

2/9

14 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर हा सगळा प्रकार घडला. न्यूझीलंडच्या केरने लाँग ऑफला चेंडू टोलावला आणि एक धाव काढली. हरमनप्रीत कौरने चेंडू अडवला होता.   

3/9

एकीकडे ओव्हर संपलेली असल्याने हरमनप्रीतला चेंडू डेड आहे असं वाटलं, तर दुसरीकडे केरने दुसऱ्या रनसाठी धाव घेतली. पण तो पूर्ण करण्याआधी ती रन आऊट झाली. पण तोपर्यंत अम्पायर्सनी टोपी दिप्ती शर्माकडे दिली होती आणि ओव्हर पूर्ण झाल्याचं जाहीर केलं होतं.   

4/9

भारतीय संघाने रन-आऊटसाठी अपील केली होती आणि दुसरीकडे केरनेही डग-आऊटच्या दिशने चालण्यास सुरुवात केली होती. पण अम्पायर्सनी ओव्हर संपली असल्याने ही धाव अयोग्य होती असं सांगत तिला नाबाद जाहीर केलं.   

5/9

यामुळे हरमनप्रीत कौर चांगलीच संतापली आणि तिने अम्पायर्ससोबत वाद घातला. मैदानाबाहेरही भारतीय प्रशिक्षक अम्पायर्सशी संवाद साधत होते. पण केर नंतर दोन चेंडूतच बाद झाली.   

6/9

दरम्यान दुबईत झालेल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 58 धावांनी पराभव केला आहे. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 160 धावा केल्या होत्या. कर्णधार सोफीने नाबाद 57 धावा ठोकल्या. पण भारतीय संघ फक्त 102 धावांवर ऑल आऊट झाला. रोजमेरीने 4 विकेट्स घेतल्या.   

7/9

पराभवानंतर हरमनप्रीतने आपल्या संघाने आपली सर्वोत्तम कामगिरी केली नसल्याचं मान्य करत, पुढील सामन्यात सुधारणा होईल याकडे लक्ष देवू असं म्हटलं आहे.   

8/9

"आम्ही आज आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळले नाही. पुढे जाऊन आम्हाला कोणत्या क्षेत्रात सुधारणा करायची आहे याचा विचार केला पाहिजे. आता प्रत्येक खेळ महत्त्वाचा आहे आणि आम्हाला आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळायचे आहे. आम्ही काही संधी निर्माण केल्या होत्या. ते आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले, यात शंका नाही," असं हरमनप्रीतने सामन्यानंतर सांगितलं.  

9/9

"या टप्प्यावर तुम्ही चुका करू शकत नाही. आम्ही अनेक वेळा 160-170 धावांचा पाठलाग केला आहे. पण त्या खेळपट्टीवर 10 ते15 अतिरिक्त धावा होत्या. एका टप्प्यावर त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, ते पाहता 180 पर्यंत पोहोचतील असं वाटलं होतं. आम्हाला अपेक्षित असलेली ही सुरुवात नव्हती," असंही ती पुढे म्हणाली.