ALERT! तुमच्या SBI खात्यातून 147.5 रुपये कमी होतायत; मेसेज आलाय का? जरा पाहून घ्या

SBI ALERT! तुमच्या खात्यातून, तुम्हाला न विचारता ही रक्कम कोण काढतंय? जाणून घ्या... कारण पैसे मेहनतीनं कमवलेयत. 

Jan 21, 2023, 08:36 AM IST

Banking News : आपल्याला दर दिवशी असंख्य मेसेज येत असतात. हे लोन, ते लोन, ही स्कीम आणि बरंच काही. अशा या मेसेजकडे सहसा आपण दुर्लक्ष करतो. पण, Rs 147.5 has been deducted from your account असा मेसेज आला असेल तर मात्र इथं लक्ष द्या. 

1/5

SBI

why SBI Deducts 147 rs from your Account know more

आपल्या परवानगीशिवाय कुणीतरी आपले पैसे काढतंय हीच पहिली शंका तुमच्या मनात घर करुन गेली असेल.   

2/5

SBI Maintainance Fee

why SBI Deducts 147 rs from your Account know more

आणखी चुकीच्या विचारांमागे धावण्याआधी तुम्ही ही संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचा. कारण कुणीही तुमच्या खात्यातून तुमच्या परवानगीशिवाय पैसे काढलेले नाहीत. कारण ही रक्कम बँकेकडूनच आकारली जात आहे. 

3/5

SBI Card Maintainance Fee

why SBI Deducts 147 rs from your Account know more

बँकेकडून दिले जाणारे विविध कार्ड्स आणि त्यांच्यावर असणाऱ्या सवलतींसाठीची ही 125 रुपयांची Maintainance Fee आहे. यामध्ये 18 टक्के जीएसटी जोडल्यास ही रक्कम 125+22.5 = 147.5 इतकी होते. हीच रक्कम तुमच्या खात्यातून कमी झाल्याचा मेसेज येतो. 

4/5

SBI Cards charges

why SBI Deducts 147 rs from your Account know more

एसबीआयच्या (SBI Platinum card) प्लॅटिनम डेबिट कार्ड असणाऱ्यांना यासाठी 250 + जीएसटी इतकी रक्कम वार्षिक फी म्हणून द्यावी लागते. तर, प्राईड प्रिमीयम बिझनेस कार्डसाठी ही रक्कम रुपये 350 + जीएसटीची रक्कम इतकी असते.   

5/5

SBI Cards

why SBI Deducts 147 rs from your Account know more

अनेक सार्वजनिक श्रेणीतील अनेक बँका ही फी म्हणून 300 + जीएसटी इतकी रक्कम त्यांच्या डेबिट कार्ड धारकांकडून आकारतात. त्यामुळं गोंधळून आणि घाबरून जाण्याचं मुळीच कारण नाही. तुमचे पैसे सुरक्षितच आहेत.