विमानात चढताना एअर होस्टेस प्रवाशांचं स्वागत का करतात? औपचारिकता नाही, तर यामागे आहे 'हे' कारण

जेव्हा आपण विमानातून प्रवास करतो तेव्हा सर्वप्रथम विमानात चढता क्षणीच एअर होस्टेस आपलं नमस्कार करुन स्वागत करतात. ही एक औपचारिकता नसून यामागे एक कारण आहे. 

Oct 05, 2024, 16:31 PM IST
1/7

भारतीय संस्कृतीत पाहुण्यांचं स्वागत करण्याची परंपरा आहे. घरात येणाऱ्यांना आपण सर्वप्रथम नमस्कार करतो. तसंच विमानात पाहुण्यांचं स्वागत करताना एअर होस्टेस प्रवाशांचं स्वागत विमानाच्या दारातच उभे राहून हसतमुखाने नमस्कार करत स्वागत करतात. 

2/7

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की एअर होस्टेस आपलं स्वागत करण्यामागे फक्त आणि फक्त औपारिकचा आहे. पण नाही थांबा यामागे एक सर्वात महत्त्वाच कारण आहे. 

3/7

हंगेरियन एअरलाइन विझ एअरचे एअर होस्टेस रानिया हिने यामागील कारण सांगितलंय. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली ज्याला आतापर्यंत 68 कोटी हून अधिक लोकांनी पाहिलंय. 

4/7

रानिया सांगते की, त्यांना विमानाच्या दारावर उभं राहून प्रवाशांचं स्वागत करणं बंधनकारक असतं. यामागे कारण असं आहे की, विमानात प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांबद्दल त्यांना माहिती करुन घ्यायची असते. 

5/7

जसं की, प्रवाशाने दारू तर नाही प्यायली आहे? कोणता प्रवासी आजरी आहे का? विमानात किती ज्येष्ठ नागरिक आहे, किती लहान मुलं आहे एवढंच नाही तर कोणी गर्भवती महिला तर नाही? हे एअर होस्टेस तपासत असतात. 

6/7

यावरुन त्यांना विमान प्रवाशांदरम्यान कोणत्या प्रवाशाची जास्त काळजी घ्यायची आहे. शिवाय आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणाला मदतीची गरज भासेल याची नोंद करुन अशा प्रवाशांसाठी काही एअर होस्टेसची नेमणूक करण्यात येते. 

7/7

शिवाय लहान मुलं, वृद्ध आणि मानसिक त्रास असलेल्या प्रवाशांना चुकून आपत्कालीन दरवाजा जवळ जागा मिळाली असेल तर त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा देण्यात येते. त्यामागे सुरक्षेचं कारण असतं.