World Cup 2023: वर्ल्ड कपआधी वीरेंद्र सेहवागची मोठी भविष्यवाणी म्हणतो, 'या' 4 टीम सेमीफायनल खेळणार!

ICC Mens Cricket World Cup Semi  Finalists: भारताचा धुरंधर आणि विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) याने कोणच्या टीम सेमीफायनल खेळणार यावर मोठी भविष्यवाणी केलीये.

Aug 12, 2023, 20:45 PM IST

ICC Mens Cricket World Cup Semi  Finalists: भारताचा धुरंधर आणि विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) याने कोणच्या टीम सेमीफायनल खेळणार यावर मोठी भविष्यवाणी केलीये.

1/5

सेहवाग म्हणे...

Virender Sehwag On CWC 2023 Semi  Finalists: येत्या 5 ऑगस्टपासून क्रिकेटचा कुंभमेळावा भारतात आयोजित केला जातोय. त्यामुळे आता कोणती टीम यंदा बाजी मारणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता भारताचा धुरंधर आणि विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने मोठं वक्तव्य केलंय.

2/5

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या मजबूत संघ आहे. कसोटी टेस्ट आणि अॅशेसमुळे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे सेहवागने ऑस्ट्रेलियन संघाला पहिली पसंती दिलीये. 

3/5

इंग्लंड

इंग्लंडचा खेळाडू सरळ बॅटने खेळू शकतात, त्यामुळे इंग्लंडचा संघ यंदा बाजी मारू शकतो, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.  

4/5

टीम इंडिया

आयसीसीच्या शेड्यूल लॉन्चिंग इवेंटमध्ये बोलताना सेहवागने भारतीय संघाला देखील प्राधान्य दिलंय. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल, अशी सेहवागला अपेक्षा आहे.

5/5

पाकिस्तान

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे वीरेंद्र सेहवागने टॉप 4 संघाच्या यादीत पाकिस्तानचं देखील नाव घेतलंय. पाकिस्तानचा संघ देखील सेमीफायनलमध्ये खेळेल, असं सेहवागला वाटतंय.