Infertility: तुमच्या 'या' सवयी करतात थेट लैगिंक क्षमतेवर परिणाम; पोरांनो आत्ताच काळजी घ्या!

एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिकरित्या जर गर्भधारणा (Pregnancy) होत असेल तर त्याला वंध्यत्व असं म्हटलं जातं. जगातील सहापैकी एका व्यक्तीला वंध्यत्वाच्या म्हणजेच इन्फर्टिलिटीने (Infertility) ग्रासल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून नुकतीच समोर आली आहे. याचाच अर्थ असा होतो की, जगातील सुमारे 17 टक्के नागरिकांना वंध्यत्वाच्या समस्या आहेत. त्याची कारणं कोणती जाणून घेऊया... 

May 03, 2023, 18:00 PM IST

Infertility Causes: एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिकरित्या जर गर्भधारणा (Pregnancy) होत असेल तर त्याला वंध्यत्व असं म्हटलं जातं. जगातील सहापैकी एका व्यक्तीला वंध्यत्वाच्या म्हणजेच इन्फर्टिलिटीने (Infertility) ग्रासल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून नुकतीच समोर आली आहे. याचाच अर्थ असा होतो की, जगातील सुमारे 17 टक्के नागरिकांना वंध्यत्वाच्या समस्या आहेत. त्याची कारणं कोणती जाणून घेऊया... 

1/6

लठ्ठपणा

वंध्यत्वासाठी लठ्ठपणा हे एक प्रमुख कारण आहे. पुरुषांमधील लठ्ठपणामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते, ज्याचा परिणाम शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते आणि मुल जन्मास घालणं अवघड होऊन बसतं.

2/6

धूम्रपान

धूम्रपान ही जगातील सर्वात मोठी समस्या आहे. धुम्रपान केल्यानं अंडी आणि शुक्राणूंमधील डीएनए खराब होऊ शकतो, ज्याच्या थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो.

3/6

खुप जास्त मद्यपान

सध्या भारतात क्रेझ आहे ती अल्कोहोलिक होण्याची. अनेक तरुण तरुणी फार कमी वयात दारूच्या व्यस्नी जातात. जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानं पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या प्रजनन क्षमतेस हानी पोहोचते. त्यामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो.

4/6

वाईट आहार

खराब आहारामुळे हार्मोन्सची पातळी वाढते. त्यामुळे करून प्रजनन क्षमता कमी करून वंध्यत्व वाढू शकतं. फॅट, शुगर आणि प्रोसेस्ड फूड्समुळे शरिरावर जास्तीचा परिणाम दिसून येतो.

5/6

व्यायाम न करणे

व्यायाम करणं गरजेचं आहे. लठ्ठपणा, हार्मोनल असंतुलन आणि कमी प्रजनन क्षमता नष्ट करायचं असेल तर व्यायाम गरजेचा आहे. व्यायामाद्वारे तणाव कमी करून तुम्ही प्रजनन क्षमता सुधारू शकता.

6/6

टेन्शन

टेन्शन कोणाला येत नाही. मात्र, त्यातून पर्याय काढणं गरजेचं असतं. स्ट्रेस हार्मोन लेवल, ओव्यूलेशन आणि स्पर्म प्रोडक्शनवर याचा थेट परिणाम दिसून येतो.