काळी, पिवळी, गुलाबी किंवा लाल: जीभेच्या रंगावरून मिळतात आजारांचे संकेत

आपण कधीही डॉक्टरकडे गेलो आणि काय त्रास होतोय हे सांगितलं तर सगळ्यात आधी डॉक्टर आपली जीभ तपासतात. आपली जीभ आपल्याला नक्की काय होतंय हे दाखवते. यावेळी डॉक्टर आपली जीभ का तपासतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? त्याचं कारण म्हणजे जीभेचा रंग. जीभेचा रंग तुमच्या शरिरात होणाऱ्या सगळ्या बदलांचा जणू आरसा आहे. आज आपण जीभेचा बदलणारा रंग हा आपल्या पचनासंबंधीत समस्या, हार्मोनल इमबॅलेन्स, रक्ताची कमी आणि इतर काही समस्यांचा इशारा देते. 

Diksha Patil | Nov 22, 2024, 15:10 PM IST
1/7

एकीकडे गुलाबी जीभ ही निरोगी असल्याचं संकेत देते तर दुसरीकडे पिवळी, लाल आणि काळी जीभ आरोग्या संबंधीत गंभीर समस्या दर्शवते. चला तर जाणून घेऊया कोणत्या रंगाची काय संकेत देते. 

2/7

लाल जीभ

ज्यांची लाल जीभ असते त्यांना आरोग्या संबंधीत अनेक समस्या असल्याचे दर्शवते. व्हिटामिन बीची कमी, स्कार्लेट फीवर, एलर्जी रिअॅक्शन, ग्लोसाइटिस आणि कावासाकी आजारांची लक्षणं आहेत. 

3/7

हिरवी जीभ

हिरवी जीभ ही बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शनचं संकेत देतात. त्याशिवाय ल्यूकोप्लाकिया, लाइकेन प्लानस आणि ओरल हेल्थ चांगलं नसल्याचं दर्शवतात. जर कधी तुमची जीभ ही हिरवी झाल्याचं दिसतंय तर लगेच डॉक्टरांची भेट घ्या. 

4/7

पिवळी जीभ

पिवळी जीभ हे शरिरात मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया झाल्याचं आणि ओरल हेल्थ चांगलं नसल्याचं कारण ठरते. त्याशिवाय अ‍ॅक्जिमा, कावीळ किंवा दुर्मिळ मधुमेह असण्याची शक्यता दर्शवते. 

5/7

जांभळी जीभ

तुमची जीभ जांभळी झाली असेल तर त्याचं कारण रक्ताभीसरण योग्य पद्धतीनं होत नसल्याचं दर्शवतं. याशिवाय हृदयासंबंधीत आजार आणि कावासाकी या आजारासारख्या समस्या उद्भवतात. 

6/7

काळी जीभ

काळी जीभ असण्याचं कारण खराब ओरल हेल्थ, काही औषण आणि तंबाखूचं सेवन आणि रेडिएशन थेरेपी असू शकते. जीभ काळी असल्याचे जाणवल्यास गंभीर समस्या असण्याची शक्यता आहे. 

7/7

गुलाबी जीभ

गुलाबी जीभ आणि त्यावर छोटे छोटे बंप्स असल्यास तुमचं शरीर हे हेल्दी असल्याचं संकेत देतं. त्याशिवाय हे संतुलित आहार दर्शवतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)