'ब्लॅक फॉरेस्ट' केकचा 'त्या' घनदाट, रहस्यमयी जंगलाशी नेमका काय संबंध? कसं पडलं हे नाव?
Black Forest Cake Interesting Facts : एखाद्याचा वाढदिवस असो किंवा मग एखादं सेलिब्रेशन... आनंदाच्या अनेक प्रसंगी केक कापण्याचा पायंडा अनेक ठिकाणी पाडण्यात आला आहे. अनेकांना ही कृती कितीही पाश्चिमात्य वाटली तरीही त्या कृतीमागे असणाऱ्या भावनाच अधिक महत्त्वाच्या. अशा या केकचा जेव्हाजेव्हा उल्लेख येतो तेव्हा एक चव कायमच सर्वांच्या पसंतीस उतरते.
1/7
केक

Black Forest Cake : वाढदिवसापासून सहजच केक खावासा वाटतोय म्हणणाऱ्यांची पसंती असते ती म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट या फ्लेव्हरच्या एका विशिष्ट चवीच्या या केकला. मागील काही वर्षांमध्ये Pastry Chefs कडून विविध चवींचे केक तयार करण्यात आले. पण, या साऱ्यांमध्ये ब्लॅक फॉरेस्ट मात्र आपली जागा टिकवून आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
2/7
अनेकांचा समज

3/7
चॉकलेट

असं म्हटलं जातं, की या केकला पहिली ओळख 1500 च्या दशकामध्ये मिळाली होती. हा तोच काळ होता जेव्हा युरोपात पहिल्यांदाच चॉकलेट तयार करण्यात आलं होतं. असं म्हणतात की, त्या काळात हे चॉकलेट जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्ट येथे तयार करण्यात आलं होतं. हे तेच ठिकाण होतं जे तेथील आंबट चेरी आणि किर्शवासेर नावाच्या चेरीपासून तयार करण्यात आलेल्या ब्रँडीमुळं ओळखलं जात होतं.
4/7
लालबुंद चेरी

5/7
जंगल

जगभरात असणाऱ्या काही अद्वितीय जंगलांपैकी एक म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट. हे जंगल अतिशय सुंदर आणि रहस्यमयी असून, तिथं वृक्षांची दाटी इतकी आहे, की जंगलातील भूभागावर सूर्यकिरणं सहजगत्या पोहोचूच शकत नाहीत. जर्मनीमधघ्ये असणारं हे जंगल समुद्रसपाटीपासून 4898 फूट उंचीवर आहे. या जंगलात गेलं असता भर दिवसाही रात्रीचाच भास होतो, ज्यामुळं ते ब्लॅक फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं.
6/7
ब्लॅक फॉरेस्ट
