भारताविरुद्ध खेळणार 140 किलोचा 'जगातील सर्वाधिक वजनदार खेळाडू'; रोहित शर्माचं टेन्शन वाढलं

Heaviest Cricketer In World To Play Against India: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानची पहिली कसोटी 12 जुलैपासून खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या संघात स्थान देण्यात आलेल्या एका खेळाडूच्या नावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा खेळाडू तब्बल 140 किलो वजनाचा असून त्याची कामगिरीही त्याच्याइतकीच वजनदार असल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचं टेन्शन वाढू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोण आहे हा खेळाडू आणि काय सांगतेय त्याच्या कामगिरीची आकडेवारी पाहूयात...

Swapnil Ghangale | Jul 09, 2023, 16:09 PM IST
1/11

Heaviest Cricketer In World Rahkeem Cornwall To Play Against India

West Indies announce 13-man squad for 1st Test vs Team India: वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. या टीममध्ये 2 अनकॅप्ड म्हणजेच यापूर्वी कधीही अंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. यात जगातील सर्वात जास्त वजन असलेल्या एका खेळाडूचाही समावेश आहे.

2/11

Heaviest Cricketer In World Rahkeem Cornwall To Play Against India

विशेष म्हणजे भारताविरुद्धच्या सामन्यात 'जगातील सर्वात वजनदार खेळाडू' म्हणून ओळख असलेला फिरकीपटू रहकीम कॉर्नवॉललाही (Rahkeem Cornwall) संधी देण्यात आली आहे. 

3/11

Heaviest Cricketer In World Rahkeem Cornwall To Play Against India

वेस्ट इंडिजच्या संघाने त्यांच्या घरगुती मैदानांवर होणाऱ्या 2 कसोटी सामन्यांपैकी पहिल्या कसोटी सामन्यासाठी अनेक आश्चर्यकारक नावांचा समावेश असलेल्या संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या सामन्यामधून दोन्ही संघ पुढील आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपसाठीचा श्री गणेशा करतील.

4/11

Heaviest Cricketer In World Rahkeem Cornwall To Play Against India

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डोमिनिका येथील विंडसर पार्क येथे सुरु होणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटी 20 जुलै रोजी त्रिनिनादमधील क्विन्स पार्क ओव्हलच्या मैदानात होणार आहे.

5/11

Heaviest Cricketer In World Rahkeem Cornwall To Play Against India

भारताविरुद्धच्या संघात रहकीम कॉर्नवॉलला स्थान दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रहकीम कॉर्नवॉल तब्बल 2 वर्षानंतर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. 

6/11

Heaviest Cricketer In World Rahkeem Cornwall To Play Against India

रहकीम कॉर्नवॉल आपला पहिला कसोटी सामना 2021 मध्ये नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. तो गॉल येथील मैदानात हा कसोटी सामना खेळला होता.

7/11

Heaviest Cricketer In World Rahkeem Cornwall To Play Against India

रहकीम कॉर्नवॉलच्या कसोटी कारकिर्दीबद्दल सांगायचं झाल्यास त्याने 9 सामन्यांमध्ये 34 गडी बाद केले आहेत.

8/11

Heaviest Cricketer In World Rahkeem Cornwall To Play Against India

रहकीम कॉर्नवॉल चांगला फलंदाजही आहे. त्याने 9 सामन्यांमध्ये 238 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 इतकी आहे.  

9/11

Heaviest Cricketer In World Rahkeem Cornwall To Play Against India

रहकीम कॉर्नवॉलचं वजन 140 किलो आहे. तो जगातील सर्वात जास्त वजन असलेल्या क्रिकेटपटू आहे.

10/11

Heaviest Cricketer In World Rahkeem Cornwall To Play Against India

वेस्ट इंडिज संघामध्ये फिरकी गोलंदाज म्हणून संधी मिळण्यासाठी पहिली पसंती असलेला गुडाकेश मोटी हा जायबंदी असल्याने रहकीम कॉर्नवॉलला संघात स्थान मिळालं आहे.

11/11

Heaviest Cricketer In World Rahkeem Cornwall To Play Against India

रहकीम कॉर्नवॉलची कामगिरी पाहता भारतीय संघाला म्हणजेच रोहित अॅण्ड कंपनीसमोर फिरकी गोलंदाजी खेळून काढण्याचं आव्हान असेल.