Real Life Weight Loss Story : जंकफूड खाऊन 7 महिन्यात डॉ. शशांकने कमी केलं 30 किलो वजन कमी, असा होता डाएट

Real Weight Loss Story : प्रत्येकाचा वजन कमी करण्याचा प्रवास वेगळा असतो. डॉ. शशांक सिंघल यांनी आपला वजन कमी करण्याचा प्रवास शेअर केला आहे. यामधून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. आणि वाचून ती व्यक्ती हेल्दी लाइफस्टाइलकडे वळू शकते. 

| Mar 20, 2024, 13:00 PM IST

प्रत्येकाचा वजन कमी करण्याचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती वजन कमी करण्यासाठी एक अनोखं कारण शोधत असतो.  शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी डॉ शशांक सिंघल यांनी वजन कमी करण्याचा विचाक केला. पेशाने शिक्षक असलेल्या डॉ. शशांक यांनी म्हटलं की, मला जाणवू लागलं की, माझा स्टॅमिना कमी झालाय. तसेच मी बराचकाळ मुलांना शिकवू शकत नव्हतो. तसेच हृदयाशी संबंधित त्रासही डोके वर करू लागले होते. या वजनामुळे कधी आपला मृत्यू होईल, अशी भीती देखील वाटू लागली. 

एवढंच नाही तर अशावेळी त्यांना त्याच्या वहिनीचे शब्द कानी पडले, शशांक वजन कर, नाहीतर भविष्यात त्रास होईल. डॉ. शशांक सिंघल यांच्याशी या फिटनेस जर्नीबद्दल चर्चा केल्यावर त्यांनी हा प्रवास उलघडला.

1/7

किती दिवसांत किती किलो वजन कमी?

Weight Loss Story

 7 महिन्यांत एकूण 30 किलो वजन कमी केल्याचं, डॉ. शशांक सांगतात.  सुरुवातीला माझे वजन 105 किलो होते. त्यानंतर पहिल्या महिन्यात, माझे वजन 10 किलो कमी झाले, मात्र पुढचे 10 किलो थोडे अधिक कठीण होते, आणि मी दोन महिन्यांत 85 किलोपर्यंत पोहोचलो. शेवटचे 10 किलो हे सर्वात कठीण होते. 85 किलोवरून 75 किलोपर्यंत येण्यासाठी मला चार महिने अत्यंत शिस्त पाळावी लागली, असं डॉ. शशांक सिंघल यांनी सांगितलं.   

2/7

डाएट आणि रुटीन

Weight Loss Story

डॉ. शशांक म्हणतात की त्यांनी अक्षय कुमारकडून प्रेरणा घेतली. अक्षयने अनेक मुलाखतीत सांगितलं आहे की, सूर्यास्तानंतर काहीही खात नाही. हाच माझा डाएट मंत्रा झाला. मी ही जैन पद्धत माझ्या जेवणासाठी फॉलो केली. 

3/7

नाश्ता

Weight Loss Story

छोले-भटुरे/पावभाजी/स्टफ्ड पराठा/पुरी भाजी/पराठा सब्जी/पिझ्झा/बर्गर आणि जवळपास 400 मिली कोल्ड कॉफी. आठवड्यातून एकदा, मी माझ्या जेवणात आईस्क्रीम सुद्धा खाल्ल्याचे डॉ.शशांक सांगतात. तसेच दररोज मी 10 बदाम देखील खाल्ले होते. 

4/7

दुपारचे जेवण

Weight Loss Story

डाळ+भाजी+कोशिंबिर+पोळी+ भात असे दुपारचे जेवण असायचे. पण हे जेवण करताना पोळी आणि भात कधीच एकत्र खाल्ले जात नव्हते. तसेच या दिवसांमध्ये मी इतर कोणतेही पदार्थ खात नसे. तसेच या सगळ्यात ग्रीन टीचे सेवनही केलं. तसेच 2 किमी धावणे आणि 5 किमी सायकलिंग देखील केले. दररोज 30 ते 40 पुषअप देखील केले. 

5/7

साखर पूर्णपणे बंद केली का?

Weight Loss Story

डॉ. शशांक या प्रश्नाचं उत्तर देताना सांगतात की, मी अजिबात साखर आणि गोड पदार्थ बंद केले नाहीत. आइस्क्रिम आणि लाडवाचे सेवनहे केल्याचं शशांक सांगतात. फक्त हे पदार्थ सकाळी न्याहरीला खाल्ले जात असतं. तसेच 18 तासांचं फास्टिंग करण्यास मदत होते. 

6/7

चिट मिल होतं का?

Weight Loss Story

आठवड्यातून एक दिवस मी चिट मिल करत असे. फक्त हे चिट मिल मी सकाळीच नाश्ताला खात असे. यामध्ये माझे फेव्हरेट छोटे भटुरे होते. तसेच रिफाइंड तेल देखील बंद केलं. फक्त तूपात आणि शुद्ध तेलातील पदार्थांचे सेवन केले. 

7/7

या प्रवासातून काय शिकलात?

Weight Loss Story

संयम... संयम हा जीवनात महत्त्वाचा आहे. मग ते शारीरिक असो किंवा मानसिक. आहाराबाबतही मी संयम ठेवायला शिकलो. तुम्ही एकदा खाण्यावर नियंत्रण मिळवू शकलात तर असंख्य गोष्टी सोप्या होऊन जातात.