भारती-शहनाजपासून ते हिना खानपर्यंत सर्वांनी वापरली वजन कमी करण्यासाठी 'ही' ट्रीक

आजकाल प्रत्येकाचं फिटनेस टारगेट सेट केलेलं असत. सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच लोक आता फिटनेस फ्रिक झाले आहेत. प्रत्येकजण स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिम, योगा आणि परिपूर्ण आहार असं काही ना काही करत असतोच. परंतु बऱ्याच लोकांना याबाबत योग्य माहिती नसते, ज्यामुळे त्याचा उलट परिणाम देखील भोगावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्ही अशा काही Weight Loss ट्रीक्स सांगणार आहोत. जे अभिनेत्रींनी देखील फॉलो केलं आहे आणि ज्यामुळे त्यांचं वजन देखील कमी झालं आहे.

Jun 05, 2022, 23:25 PM IST

Celebs Weight Loss Diet Plan: आजकाल प्रत्येकाचं फिटनेस टारगेट सेट केलेलं असत. सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच लोक आता फिटनेस फ्रिक झाले आहेत. प्रत्येकजण स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिम, योगा आणि परिपूर्ण आहार असं काही ना काही करत असतोच. परंतु बऱ्याच लोकांना याबाबत योग्य माहिती नसते, ज्यामुळे त्याचा उलट परिणाम देखील भोगावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्ही अशा काही Weight Loss ट्रीक्स सांगणार आहोत. जे अभिनेत्रींनी देखील फॉलो केलं आहे आणि ज्यामुळे त्यांचं वजन देखील कमी झालं आहे.

1/6

फिटनेस फ्रीक्सच्या यादीत अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. प्रत्येकाला या सेलिब्रिटींचा फिटनेस रूटीन जाणून घ्यायचा असतो. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी काही प्रसिद्ध सेलिब्रिटींचा फिटनेस फॉरम्यूला घेऊन आलो आहोत.  

2/6

लाफ्टर क्वीन भारती सिंगने तिच्या बॉडी ट्रांसफॉर्मेशने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. भारती तिच्या फिटनेसचं क्रेडिट इंटरमिटेंट फास्टिंगला देत असते. यासाठी भारती 16 तासांहून अधिक काळ उपाशी राहायची. तिचा पहिला डाएट दुपारी 12 वाजता आणि शेवटचा डाएट संध्याकाळी 7 वाजता होता.

3/6

लॉकडाऊनमध्ये ट्रांसफॉर्मेशन करणाऱ्या शहनाज गिलनं 6 महिन्यांत 12 किलो वजन कमी केलं. तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की, तिने नॉन-वेज, चॉकलेट आणि आईस्क्रीमपासून स्वतःला पूर्णपणे दूर केलं आहे. तसेच, आपल्या रोजच्या डाएटमध्ये जास्त वरायटी घेत नव्हती. तिला दोन चपात्यांची भूक लागायची तेव्हा ती एकच चपाती खायची आणि अजूनही हेच करते.

4/6

या यादीत हिना खानचाही समावेश आहे आणि ती खूप कडक डाएट फॉलो करते. हिना खान दिवसाची सुरुवात, एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिते आणि स्वत:ला डिटॉक्स करते. याशिवाय ती कमी कार्बोहायड्रेट आणि हाई प्रोटीन डाइट फॉलो करते.

5/6

अभिनेत्री एरिका फर्नांडिसची बॉडी पाहून प्रत्येकाला तिचे सिक्रेट जाणून घ्यायचे आहे. तिच्या फिटनेस मंत्राबद्दल बोलताना एरिका म्हणाली की, ती भात आणि चपाती खात नाही, त्यामुळे तिचे वजन कमी करण्यास खूप मदत होते. कारण या दोन्हीमध्ये ग्लूटेन असतं त्यामुळे वजन खूप वाढते.

6/6

आपल्या परफेक्ट फिगरसाठी प्रसिद्ध असलेली निया शर्मा सांगते की, ती फास्ट फूड खाणं टाळते. त्याऐवजी तिला दुपारच्या जेवणात डाळ आणि रात्रीच्या जेवणात वेजिटेबल ऑमलेट खायला आवडते.